Bhandari Community In Goa: भंडारी समाजाच्या 'दुसऱ्या' सभेला मान्यता नाही! विद्यमान समितीवर विरोधक नाराज

Gomantak Bhandari Samaj: विद्यमान समितीने आमसभेला बोलावून अवघ्या साडेचार मिनिटांत सभा आटोपल्यामुळे ज्ञातीबांधवांचा एकप्रकारे अपमान केल्याचा आरोप गुरुनाथ नाईक यांनी केला.
Gomantak Bhandari Samaj:  विद्यमान समितीने आमसभेला बोलावून अवघ्या साडेचार मिनिटांत सभा आटोपल्यामुळे ज्ञातीबांधवांचा एकप्रकारे अपमान केल्याचा आरोप गुरुनाथ नाईक यांनी केला.
Bhandari CommunityDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: भंडारी समाजाच्या मांगोरहिल येथील सभेत गुरुनाथ (भाई) नाईक यांनी अशोक नाईक गटाचा तीव्र शब्दांत निषेध केला. विद्यमान समितीने आमसभेला बोलावून अवघ्या साडेचार मिनिटांत सभा आटोपल्यामुळे ज्ञातीबांधवांचा एकप्रकारे अपमान केल्याचा आरोप गुरुनाथ नाईक यांनी केला. भंडारी समाजात निवडणूक प्रक्रिया नसून, फक्त सभासदांची नेमणूक करण्याचा अधिकार घटनेत नमूद केल्याची माहिती भाई नाईक यांनी दिली.

विरोधकांनी सभा रविराज चोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली चालविली. यावेळी मंचावर विनोद किनळेकर, शरद चोपडेकर, शुभांगी वायंगणकर, श्री रुद्रेश्वर देवस्थानचे अध्यक्ष यशवंत माडकर, भंडारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ ऊर्फ भाई नाईक, फोंड्याचे नगराध्यक्ष आनंद नाईक, बेतकीचे सरपंच दिलीप नाईक, अविनाश शिरोडकर, अमृत आगरवाडेकर उपस्थित होते.

नगरसेवक दीपक नाईक म्हणाले की, प्रत्येकाला आपल्या समाजाचा अभिमान आहे; परंतु गोव्यातील इतर समाज भंडारी समाजाला कमी लेखत असून, हे योग्य नाही. सुधीर कांदोळकर म्हणाले की, या समितीने अनेक ठराव बेकायदा मांडले आहेत. विद्यमान समिती सर्व स्तरावर अपयशी ठरली आहे. समितीने गेल्या सहा वर्षांत इतर तालुक्यांत प्रगती संकुल उभारण्यात पुढाकार घेतला नाही.

सभेला मान्यता नाही

विद्यमान भंडारी समाज समितीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष अशोक नाईक यांनी दुसऱ्या गटाचा तीव्र शब्दांत निषेध केला. ही निवडणूक प्रक्रिया रामदास पेडणेकर, ॲड. सुरेश नाईक चोपडेकर, शिवानंद तळकर, ॲड. केदार शिरगावकर, वामन वैद्य यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. उपाध्यक्ष देवानंद नाईक यांनी सांगितले की, आमसभा घेण्याचा पूर्ण अधिकार आम्हाला असून दुसऱ्या गटाने घेतलेल्या सभेला कोणीच मान्यता दिलेली नाही.

Gomantak Bhandari Samaj:  विद्यमान समितीने आमसभेला बोलावून अवघ्या साडेचार मिनिटांत सभा आटोपल्यामुळे ज्ञातीबांधवांचा एकप्रकारे अपमान केल्याचा आरोप गुरुनाथ नाईक यांनी केला.
Bhandari Community In Goa: गोमंतक भंडारी समाजाची आमसभा गुंडाळली साडेचार मिनिटांत! विरोधकांनी घेतला व्यासपीठाचा ताबा

...तर समाज गप्प राहणार नाही

मुरगावचे माजी नगराध्यक्ष नितीन चोपडेकर म्हणाले, आमसभा लोकशाही मार्गाने घेणे आवश्यक होते; परंतु विद्यमान समितीने सादर केलेल्या अहवालाला मान्यता न घेता सभा साडेचार मिनिटांत संपविली, हे पूर्णपणे चुकीचे आहे. भंडारी समाजाबद्दल मराठी दैनिकांत आक्षेपार्ह विधाने केल्याबद्दल नितीन चोपडेकर यांनी दत्ता खोलकर यांचा तीव्र शब्दांत निषेध केला. यापुढे भंडारी समाजाबद्दल एखाद्याने आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिल्यास समाज गप्प राहणार नाही, असे चोपडेकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com