International Film Festival Dainik Gomantak
गोवा

Goa IFFI 54th: ‘सुवर्ण मयूर’ चा मानकरी आज ठरणार

Goa IFFI 54th: 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्या, मंगळवारी समारोप होणार आहे. या समारोपात यंदाचा ‘सुवर्ण मयुर'' कोणत्या चित्रपटाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa IFFI 54th: 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्या, मंगळवारी समारोप होणार आहे. या समारोपात यंदाचा ‘सुवर्ण मयुर'' कोणत्या चित्रपटाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. महोत्सवात यंदा 18 जागतिक, 18 आंतरराष्ट्रीय, 62 आशियाई आणि 89भारतीय प्रिमियर चित्रपट दाखविण्यात आले.

डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये हा समारोपाचा कार्यक्रम पार पडणार आहे. गोवा मनोरंजन सोसायटीच्या सीईओ अंकिता मिश्रा यांनी सांगितले की, समारोप समारंभासाठी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुरागसिंह ठाकूर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन उपस्थित राहणार आहेत.

तसेच अभिनेते आयुष्मान खुराना, रवी किशन, सिद्धार्थ रॉय कपूर, अभिनेत्री ईशा गुप्ता आणि इतर बॉलिवूड कलाकार उपस्थित राहतील. इफ्फीचा शुभारंभ ‘कॅचिंग डस्ट'' या चित्रपटाने झाला, तर अमेरिकेच्या रॉबर्ड कोलोड्नी यांचा दी फेदरवेट या चित्रपटाने समारोप होणार आहे. इफ्फीमध्ये यंदा विविध आंतरष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळालेले १९ चित्रपटांचा समावेश होता.

दरम्यान, यावर्षीपासून इफ्फीत बेस्ट वेब सिरीज (ओटीटी) पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्काराची निवड करणाऱ्या पाच सदस्यीय समितीमध्ये राजकुमार हिरानी यांचा समावेश आहे.

इफ्फीच्या मुख्य पाच ज्युरी सदस्यांमध्ये भारतीय चित्रपट निर्माते शेखर कपूर यांचा समावेश आहे, तर इतर सदस्यांमध्ये स्पॅनिश सिनेमाटोग्राफर जोस लुईस अल्केन, निर्माता जेरोम पेलार्ड, कॅथरीन डुसार्ट आणि हेलन लीक यांचा समावेश आहे. हे ज्युरींनी केलेली ‘सुवर्ण मयुर'' विजेत्या चित्रपटाची निवड जाहीर होणार आहे

मायकल डग्लस यांना जीवनगौरव

54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात ज्येष्ठ अमेरिकन अभिनेते आणि चित्रपट निर्माते मायकल डग्लस यांना चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अविस्मरणीय योगदानाबद्दल ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येईल, असे अंकिता मिश्रा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT