Gokulwada Sarvona garbage issue Dainik Gomantak
गोवा

Sarvona: सर्वण पंचायतीचे लाखो रुपये वाया! जाळीसह, लोखंडी रॉडही गायब,कचरा नियंत्रणाच्या नियोजनाचा बट्ट्याबोळ

Gokulwada Sarvona: कचऱ्याची भयानक समस्या नियंत्रणात आणण्यासाठी गोकुळवाडा-सर्वण येथे स्थानिक पंचायतीने रस्त्याच्या बाजूने लावलेल्या जाळीसह पाईपसदृश लोखंडी रॉडही सध्या गायब झाले आहेत.

Sameer Panditrao

डिचोली : कचऱ्याची भयानक समस्या नियंत्रणात आणण्यासाठी गोकुळवाडा-सर्वण येथे स्थानिक पंचायतीने रस्त्याच्या बाजूने लावलेल्या जाळीसह पाईपसदृश लोखंडी रॉडही सध्या गायब झाले आहेत.

अन्य ठिकाणी लावण्यात आलेली जाळी मातीमोल झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कचरा नियंत्रणासाठी कारापूर-सर्वण पंचायतीने केलेली उपाययोजना पूर्णपणे फसली आहे. लाखो रुपये वाया गेल्यातच जमा झाले आहेत.

सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे पंचायत इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त कारापूर येथे आले होते. त्यावेळी कचऱ्याच्या प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांनी पंचायतीला फैलावर घेतले होते. त्यानंतर पंचायतीने लागलीच स्वच्छता मोहीम हाती घेताना कचऱ्याची अस्वच्छता निर्माण झालेले परिसर चकाचक केले होते.

रस्त्याच्या बाजूने कचऱ्याचे प्रमाण नियंत्रणात यावे. यासाठी कारापूर-सर्वण पंचायतीने चार महिन्यांपूर्वी म्हणजेच पावसाळ्यापूर्वी कचऱ्यासाठी ब्लॅकस्पॉट बनलेल्या मुख्य रस्त्यासह विविध भागात पाईपसदृश्य लोखंडी रॉड पुरून ‘जाळी’ मारली होती.

मात्र पंचायतीचा हा प्रयोग पूर्णपणे फसला आहे. गोकुळवाडा-सर्वण येथील मुख्य रस्त्याच्या बाजूने लावलेली जाळी आणि ती लावण्यासाठी बसविण्यात आलेले लोखंडी ‘रॉड’ ही आता अचानक गायब झाले आहेत. त्यामुळे सध्या अनेक तर्कवितर्क वर्तविण्यात येत आहेत. जाळीसह रॉड चोरीला गेले असावेत, अशी चर्चा गावात चालू आहे. दरम्यान, वाठादेव येथे बगलमार्ग आदी भागात लावलेली जाळी मातीमोल झाल्याचे दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: गोव्यात 'व्यापम'पेक्षा मोठा घोटाळा! 'त्या' मंत्र्याला त्वरित हाकलून लावा; काँग्रेस मागणीवर ठाम

VIDEO: चीनमधील सर्वात उंच 'होंगची पूल' कोसळला! काही सेकंदात पुलाचे खांब नदीत धसले; भूस्खलनाचा थरार व्हिडिओमध्ये कैद

IND vs SA, Head To Head Record: ईडन गार्डन्स कोणासाठी लकी? टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कामगिरी कशी? जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड

"पूजा नाईकने यापूर्वी कोणाचेही नाव घेतले नव्हते", CM सावंतांनी सांगितले 'नवीन FIR' चे कारण

Delhi Car Blast: दिल्ली ब्लास्टचे पाकिस्तान कनेक्शन! संशयितांच्या चौकशीतून दहशतवादी संघटनेशी जुळले तार; जै-ए-मोहम्मदचा कमांडर निशाण्यावर

SCROLL FOR NEXT