Waste Management: वाहनातून कचरा फेकताना आढळल्यास 10 हजार दंड, परवानाही रद्द होणार; CM सावंतांचा इशारा

CM Pramod Sawant: न्हावेली पंचायत क्षेत्रात सरकारने ७८ लाख रुपये खर्चून एमआरएफ शेड उभारली असून आता आपला गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाची आहे.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

साखळी: न्हावेली पंचायत क्षेत्रात सरकारने ७८ लाख रुपये खर्चून एमआरएफ शेड उभारली असून आता आपला गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाची आहे. कचऱ्यासंदर्भात सरकारने कायदा अधिक कडक केला असून यापुढे कोणत्याही वाहनातून गावात कचरा फेकताना आढळल्यास दहा हजार रुपये दंड केला जाणार आहे.

तसेच असा प्रकार वारंवार घडत असेल तर तिसऱ्यावेळेस सापडल्यास दंडासह वाहनांचा परवानाही रद्द केला जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

साखळी मतदारसंघातील न्हावेली ग्रामपंचायतीत उभारण्यात आलेल्या एमआरएफ शेड व नूतनीकरण करण्यात आलेल्या सभागृहाच्या उद्‍घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.

यावेळी सरपंच रोहिदास कानसेकर, उपसरपंच कल्पना गावस, पंच कालिदास गावस, नारायण गावस, रितिका गावडे, अन्शी नाईक, प्रसाद नाईक, बिडिओ ओमकार मांजरेकर, देवस्थानचे अध्यक्ष विश्वंभर गावस, न्हावेली कोमुनिदादचे अध्यक्ष सिद्धांत रमेश गावस, मुखत्यार अवधूत गावस, खजिनदार सखाराम गावस व इतरांची उपस्थिती होती.

ते पुढे म्हणाले, कचरा टाकताना कोणीही आढळल्यास थेट पोलिसांशी संपर्क करून सदर वाहनाचा क्रमांक द्यावा. त्यासाठी कोणालाही हमीदार राहण्याची गरज नाही.

CM Pramod Sawant
Bainguinim Waste Plant: "कचरा प्रकल्पाला विरोध नाही; लोकांच्या भावनांचा विचार करूनच सरकार निर्णय घेईल" भाऊंचे आश्वासन

पोलिस सदर वाहन चालकास अटक करून वाहनही जप्त करतील. एकच वाहन जर तीन वेळा कचरा टाकताना सापडले, तर सदर वाहनाचा परवानाच रद्द होईल. तसेच ते वाहन कायमचे पोलिस जप्त केले जाईल.

सरपंच रोहिदास कानसेकर यांनी आपल्या स्वागतपर भाषणात न्हावेली पंचायत क्षेत्रात आत्तापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने साधलेल्या विकासाची माहिती दिली.

CM Pramod Sawant
Goa Waste Management: राज्‍यात दरदिवशी जमतो 150 टन प्‍लास्‍टिक कचरा; जनजागृतीनंतरही पिशव्‍या, बाटल्‍यांचे प्रमाण अधिक

कचरा पंचायतीकडे द्या!

न्हावेली गावात एमआरएफ शेड उभारण्यासाठी जागेची आवश्यकता होती. याकरिता न्हावेली कोमुनिदादने जागा उपलब्ध करून देत या गावाला स्वच्छ व सुंदर राखण्यात मोलाचे सहकार्य केले आहे. आता नागरिकांनी स्वतः हा गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी स्वतःची जबाबदारी ओळखत आपल्या घरात निर्माण होणारा सर्व प्रकारचा कचरा कोणत्या खुल्या जागेत किंवा रस्त्याच्या शेजारी न फेकता थेट पंचायतीकडे सुपूर्द करावा, असेही सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com