Gokarna Partgali Math Ram Naam Jap Dainik Gomantak
गोवा

Partgali Math: पर्तगाळ वर्धापनदिन सोहळ्याची सांगता! मान्यवरांची उपस्थिती; विद्याधीश तीर्थ स्वामीजींचे आशीर्वचन

Gokarna Partgali Math Goa: गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठाच्या ५५० वर्धापनदिन सोहळ्याची रविवारी भक्तिपूर्ण वातावरणात सांगता झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

काणकोण: गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठाच्या ५५० वर्धापनदिन सोहळ्याची रविवारी भक्तिपूर्ण वातावरणात सांगता झाली. यावेळी झालेल्या समारंभात श्रीमद् विद्याधीश तीर्थ वडेर स्वामी यांनी आशीर्वचन केले.

यावेळी मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे, उपाध्यक्ष शिवानंद साळगावकर, आर. आर. कामत, अवधूत कामत, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, विश्व हिंदू परिषदेचे गोपाळजी, अण्णप्पा कामत आदी उपस्थित होते.

केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी मठाला भेट देऊन स्वामीजींचे आशीर्वाद घेतले. मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. गोकर्ण पर्तगाळ मठ हा आध्यात्मिक केंद्र असून हा मठ परिसर भविष्य काळात आध्यात्मिक पर्यटन होणार असल्याचे सांगितले.

यावेळी सेवेदार व मठातील सेवेकरी यांचा स्वामीजींच्या हस्ते शाल, मंत्राक्षदा व‌ श्रीरामाची प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला.यावेळी श्रीनिवास धेंपे, अजित कामत, मुकुंद कामत, अजित कामत, दत्तराज साळगावकर, एस. मुकुंद, प्रकाश नायक, अण्णप्पा कामत, दिनेश कामत, प्रसन्न पै, संजय पै रायतुरकर, नगर मुरलीधर नायक, जगन्नाथ शानभाग, अनिरुद्ध नायक, योगेश नायक, प्रसाद पै सागर, दिनकर कामत, शशिकांत कामत, रामचंद्र कामत, जयंत कामत, नागेंद्र सागर व मठानुयायांचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन अनिल पै यांनी केले. प्रदीप पै यांनी आभार मानले.

देवालयात विनाशुल्क प्रवेश हवा

यावेळी विश्व हिंदू परिषदेचे गोपाळजी म्हणाले, देवालयात विनाशुल्क प्रवेश मिळून देव दर्शन मिळविणे हा प्रत्येक भक्तांचा अधिकार आहे.

देशभरातील देवालयात ती प्रथा सुरू व्हायला हवी, तोच सुवर्णकाळ असेल. ही प्रथा अयोध्येतील श्रीराम मंदिरापासून सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

मठानुयायींच्या मेहनतीमुळे सोहळा यशस्वी

मठाच्या ५५० व्या वर्धापनदिन सोहळा तसेच मठ नूतनीकरण कामासाठी, रामनाम जप, श्रीराम यात्रा यासाठी मठानुयायांना बरीच मेहनत घ्यावी लागली. ५५० वर्षांचा वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन हे स्पर्धात्मक परीक्षेपेक्षा जास्त कठीण होते, मात्र मठानुयायांच्या मठ व गुरू पिठावरील भक्तीमुळेच ते शक्य झाले, असे श्रीमद् विद्याधीश तीर्थ वडेर स्वामी यांनी सांगितले.

मठात दशमी व एकादशीला धार्मिक कार्यक्रम पूर्ववत सुरू करण्यात येत आहेत. प्रत्येक एकादशीला पाच जप केंद्रातील मठानुयायांनी दशमीला मठात येऊन दशमीच्या पालखी उत्सवात सहभागी व्हावे व एकादशीला भजन, नामस्मरण करून आपल्या घरी जावे असे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. या महोत्सवात देश प्रदेशांतून मठानुयायी आले याबद्दल स्वामीजींनी आनंद व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Bus Stand: गुड न्यूज! गोव्यातील 'ही' बसस्थानके होणार चकाचक; जवळपास 400 कोटी खर्चून मिळणार अद्ययावत सुविधा

Serendipity Festival 2025: सेरेंडिपीटीत अवतरणार महाकाय नरकासुर! 5 वेगवेगळ्या ठिकाणी मिळणार पाहायला; संपूर्ण माहिती जाणून घ्या..

एकाच घरातील तिघी बहिणी, भाऊ आणि बॅचलर पार्टीसाठी आलेला 'इशाक'; हडफडे क्लब आगीमुळे एका क्षणात अनेक कुटुंबांवर शोककळा

Goa Live News: 'या दुःखद घटनेने मन हेलावले', क्लब मालक सौरभ लुथरा यांची इन्स्टाग्रामवर पोस्ट

Goa Theft: गोव्यातील हॉस्पिटलमध्ये केली चोरी, मुंबईला गेला पळून; लोकेशन ट्रेस झाल्यामुळे सराईत चोरटा जेरबंद

SCROLL FOR NEXT