St Francis Xavier Feast Dainik Gomantak
गोवा

St Francis Xavier Feast: गोयंचा साहेब! प्रेम आणि एकोप्याचे प्रतीक जगप्रसिध्द सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्त

लिओपोल्डो गिरेली यांच्या विशेष उपस्थितीत शनिवारी साडे दहा वाजता हाय मास होणार आहे.

Pramod Yadav

प्रेम आणि एकोप्याचे प्रतीक असेलले जगप्रसिध्द सेंट फ्रान्सिस झेवियर यांची फेस्त आज साजरी होत आहे. जुने गोवे (Old Goa) येथे मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव प्रभू येशू आणि सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे दर्शन आणि प्रार्थनेसाठी हजेरी लावत आहेत. भारत आणि नेपाळचे अपोस्टोलिक नुनसिओ रेव्ह. लिओपोल्डो गिरेली यांच्या विशेष उपस्थितीत शनिवारी साडे दहा वाजता हाय मास होणार आहे.

सेंट फ्रान्सिस झेवियर 1541 साली लिस्बन येथून प्रवास करीत 6 मे 1542 रोजी भारतात पोहचले. गोव्यात येण्यासाठी त्यांना एक वर्ष एक महिना चार दिवस एवढा कालावधी लागला. गोव्यात आल्यानंतर त्यांनी प्रेम आणि एकोपा यांचा संदेश देण्यासाठी पायपीट केली. गोव्याहून त्यांनी वसई, त्रिवेंद्रम, मद्रास, मैलापूर, मलाया, मलाक्का, इंडोनेशिया, फिलीपाईन, जावा, बोर्नियो, जपान असा प्रवास करून त्यांनी धर्माचा प्रसार केला.

अपोस्टोलिक नुनसिओ रेव्ह. लिओपोल्डो गिरेली यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सांवत यांची अलतिनो, पणजी येथे भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत कार्डिनल फिलिप नेरी फेर्राव उपस्थित होते.

सेंट फ्रान्सिस झेवियर यांनी येशू ख्रिस्ताविषयी उपदेश आणि शिकवणीद्वारे लोकांमध्ये एकोपा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. “सेंट फ्रान्सिस झेवियर हातात बेल आणि क्रॉस घेऊन बाहेर पडायचे. लोकांना चर्चमध्ये घेऊन जायचे व त्यांना कथा सांगून प्रार्थना करायला सांगयचे. अशी त्यांची शिकवण्याची अनोखी पद्धत होती.” असे बॅसिलिका ऑफ बॉम जिझसचे रेक्टर, फादर पॅट्रिसिओ फर्नांडिस सांगतात.

आजचे मास

अपोस्टोलिक नुनसिओ रेव्ह. लिओपोल्डो गिरेली यांच्या उपस्थितीत 10:30 वाजता विशेष मास झाल्यानंतर दुपारी 12:30, 3:00, 4:00, 5:00 आणि 6:00 वाजता इंग्रजीत मास होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

National Shilp Guru Award: गोव्याच्या मातीकलेचा राष्ट्रीय गौरव! अमर शेट यांना 'राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार'

Yuzvendra Chahal: वर्ल्ड कप 2023 मधून पत्ता का कट झाला? युजवेंद्र चहलचा मोठा खुलासा; म्हणाला, 'रोहित शर्माने मला आधीच सांगितले होते...'

Unnatural Death Case: नागव्यात 17 वर्षीय मुलाची आत्महत्या; हणजूण पोलिसांकडून तपास सुरू

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

SCROLL FOR NEXT