Pramod Sawant: भारताच्या प्रगती आणि सुरक्षेला कोणापासून धोका? काय म्हणाले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

BITS पिलानी कॅम्पसमध्ये आयोजित ICISPD 2022 याआंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.
Pramod Sawant
Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को शहरातील BITS पिलानी कॅम्पसमध्ये 'माहिती सुरक्षा, गोपनीयता आणि डिजिटल फॉरेन्सिक्स' (ICISPD 2022) या आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Goa CM Pramod Sawant) यांनी सायबर शिक्षण, सुरक्षा आणि आव्हान याबद्दल विचार व्यक्त केले.

भारताच्या प्रगती आणि सुरक्षेला सायबर गुन्हेगारीपासून धोका आहे. असे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

(Cyber crime threat to India’s progress, security: Goa CM Pramod Sawant)

Pramod Sawant
Petrol-Diesel Price In Goa: पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जाहीर, गोव्यात काय आहे स्थिती?

"भारताच्या प्रगती आणि सुरक्षेला सायबर गुन्हेगारीपासून धोका आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी सायबर योद्धा निर्माण करणे ही काळाची गरच आहे." असे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. 'सोशल मिडिया गोपनीयता हा दिवसेंदिवस महत्वाचा विषय बनत चालला असून, त्याकडे दुर्लेक्ष करता येणार नाही. तसेच, सायबर गुन्हे, अधुनिक तंत्रज्ञान आणि सायबरमधील अद्यापत गोष्टींचे लोकांना ज्ञान आवश्यक आहे.' असे डॉ. सावंत यांनी यावेळी नमूद केले.

Pramod Sawant
Goa Sand Mining: राज्यात वाळू उपशाला हिरवा कंदील; मात्र 'हे' नियम असणार लागू

"नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) आकडेवारीनुसार, देशात आजवर एकूण 52,974 सायबर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. 2020 पासून सायबर गुन्ह्यात 5.9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2020 मध्ये 3.7 टक्क्यांवरून ही वाढ 2021 मध्ये 3.9 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. जन्माला आलेलं प्रत्येक मुल आज इंटरनेट विरहित जगाची कल्पना करू शकत नाही. कोरोना काळात या तंत्रज्ञानाचा अधिक फायदा झाला. लोकांना सतत संपर्कात राहणे शक्य झाले, डिजिटल पेमेंट करता आले. आणि महत्वाचे म्हणजे वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून काम करता आले." असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com