fire at Parcem  dainik gomantak
गोवा

Fire At Parcem: पार्से येथे गोदामाला आग; 3.5 लाखांचे नुकसान, एक जखमी

आग एवढी भीषण होती की यात गोदाम पूर्णपणे जळून खाक झाले आहे.

Pramod Yadav

Fire At Parcem: पार्से येथे गोदामाला आग लागल्याने 3.5 लाख रूपयांचे नुकसान झाले असून, यात एक व्यक्ती जखमी झाला आहे. आज (बुधवारी) पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली.

आग एवढी भीषण होती की यात गोदाम पूर्णपणे जळून खाक झाले आहे.

राजेंद्र जिवबा चारी असे या आगीत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. चारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्से येथे सकाळी पहाटेच्या सुमारास गोदामाला अचानक आग लागली. आग मोठी असल्याने तात्काळ अग्निशमन दलाल माहिती देण्यात आली. अर्ध्या तासानंतर दलाचे जवान दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळवले.

या आगीत साडे तीन लाखांच्या जवळपास नुकसान झाल्याची माहिती चारी यांनी दिली.

आग नेमकी कशामुळे लागली याबाबत माहिती नसल्याचे चारी यांनी सांगितले. दरम्यान, घटनास्थळी तलाठी यांनी पाहणी करून घटनेची माहिती घेतली.

दरम्यान, आगीत गोदामाचे मोठे नुकसान झाले असून, संपूर्ण गोदाम जळून खाक झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Crisis: गोव्यात पावसाची विक्रमी तूट, तापमान 37 अंशांपार! आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट?

Mumbai Indians Captaincy: रोहित शर्माला पुन्हा कॅप्टन बनवण्याच्या बातम्या अफवाच, एमआयने कर्णधारपदाबाबत स्पष्टचं सांगितलं; समोर आली महत्त्वाची माहिती

Goa Undeclared Assets: गोव्यातील 1200 लोकप्रतिनिधींची नावे जाहीर! मालमत्तेचे विवरणपत्र न दिल्याने लोकायुक्तांची कारवाई

Goa Waste Management: साळगावचा कचरा प्रकल्प 25 दिवस बंद! उत्तर गोव्यात कचरा व्यवस्थापनाचे मोठे आव्हान

Saudi Aramco Missile Attack: जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीवर मिसाइल हल्ला, क्राउन प्रिन्सच्या इशाऱ्यानंतर हूतींची काही तासांतच दुप्पट वेगाने कारवाई VIDEO

SCROLL FOR NEXT