गोवा क्रीडा प्राधिकरणच्या जागेवर अतिक्रमण, बेकायदेशीररित्या भरवले प्रदर्शन - गोवा फर्स्ट

जागा गोवा क्रिडा प्राधिकरणाची आणि आर्थिक फायदा एका राजकीय व्यक्तीचा होत असल्याची माहिती परशुराम सोनुर्लेकर यांनी दिली आहे.
Vasco
VascoDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को चिरकून उडी येथील 'गोवा क्रिडा प्राधिकरण ' (साग) च्या जागेवर बेकायदेशीररित्या गोवा ग्राहक प्रदर्शन भरवून अतिक्रमण केले आहे. ग्राहक प्रदर्शन उभारताना सरकारी नियमांचे पूर्णपणे उल्लंघन केल्याचा आरोप बिगर सरकारी संस्था गोवा फर्स्ट तर्फे करण्यात आले आहे.

वास्को चिरकून उडी बेलाबाय येथे (सागच्या)टिळक मैदानाच्या जागेत बेकायदेशीररित्या उभारलेल्या ग्राहक प्रदर्शना विरोधात गोवा फर्स्टने गोवा क्रिडा प्राधिकरण, मुरगाव नगरपालिका, गोवा अग्निशमन दल, मुरगाव तालुका उपजिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली असल्याची माहिती गोवा फर्स्टचे अध्यक्ष परशुराम सोनुर्लेकर यांनी दिली आहे.

वास्को येथील टिळक मैदानावर फुटबॉल किंवा इतर सामने पाहण्यासाठी येणाऱ्या वाहनासाठी, वास्को चिरकून उडी बेलाबाय येथे पार्किंगसाठी सागने जागा उपलब्ध करून ठेवली आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून या जागेवर बेकायदेशीर कामे होत असल्याचे निदर्शनास येत आहे. सदर 'सागच्या' जागेवर रेल्वे तर्फे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. तसेच भंगार वाहने येथे ठेवण्यात आली आहे.

Vasco
Churchill Alemao: 'चर्चिल भाजपचे वेल विशर, पण...', आलेमाव यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल तानावडे काय म्हणाले?

या जागेवर शहरातील मोठ्या प्रमाणात खाजगी बस पार्क केलेल्या नजरेस पडतात. संपूर्ण जागा बेवारस असल्या प्रमाणे कोणीही येऊन, या जागेचा गैर फायदा घेत आहे. सागच्या या जागेवर अनेकवेळा सरकारी नियमाचे उल्लंघन करून ग्राहक प्रदर्शन उभारले जात आहे. वर्षाला तीन ते चार वेळेला सागच्या टिळक मैदानच्या जागेवर ग्राहक प्रदर्शन भरविले जाते. यासाठी लागणारे नियम धाब्यावर बसवून संबंधीत व्यक्ती बेकायदेशीर कृत्य करीत आहे.

19 एप्रिल 2023 रोजी साग, मुरगाव नगरपालिका, राज्य अग्निशमन दल व इतर संबंधीत विभागाची परवानगी न घेता चिरकून उडी बेलाबाय टिळक मैदानाच्या जागेवर बेकायदेशीर गोवा ग्राहक प्रदर्शन उभारून व्यवसाय सुरू केला असल्याचा आरोप गोवा फर्स्टचे अध्यक्ष परशुराम सोनुर्लेकर यांनी केला आहे.

Vasco
Viral Video: हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना रोखणार कोण? कारच्या छतावर बसून स्टंटचा व्हिडिओ व्हायरल

वास्को टिळक मैदानाच्या चिरकून उडी बेलाबाय जागेवर, यापुर्वीही बेकायदेशीर ग्राहक प्रदर्शन उभारले असल्याचा दावा गोवा फर्स्टचे सोनुर्लेकर यांनी केला आहे.

ग्राहक प्रदर्शन भरविताना ज्या जागेवर प्रदर्शन उभारणार त्याची परवानगी घेणे आवश्यक असते. परंतु ग्राहक प्रदर्शन उभारलेल्यानी एका राजकीय व्यक्तीचा पाठिंबा घेऊन, सागच्या जागेवर बेकायदेशीररित्या अतिक्रमण केले आहे. चिरकून उडी येथे उभारलेल्या ग्राहक प्रदर्शनला एकाही सरकारी विभागाची परवानगी नसताना, बेकायदेशीर ग्राहक प्रदर्शन उभारलेले आहे. जागा गोवा क्रिडा प्राधिकरणाची आणि आर्थिक फायदा एका राजकीय व्यक्तीचा होत असल्याची माहिती परशुराम सोनुर्लेकर यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com