Vasco  Dainik Gomantak
गोवा

Vasco News : तुमच्यातच देव आहे, शोधून पाहा म्हणजे सापडेल! नरेंद्राचार्यजी महाराज

Vasco News : गोवा उपपीठावर प्रवचन, चरण दर्शन सोहळा

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco News :

वास्को, तुमच्यातच देव आहे शोधून पहा म्हणजे सापडेल. त्यासाठी केवळ भक्तीची गरज आहे. तुम्ही मला भक्ती द्या, मी तुम्हाला स्थैर्य देईन, असे प्रतिपादन गोवा उपपीठावर शिवमंदिरात आज आयोजित समस्या मार्गदर्शन व चरण दर्शन सोहळ्यात जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज यांनी मार्गदर्शन केले.

जगद्‍गुरू नरेंद्रचार्यजी महाराज म्हणाले की, आत्ताचे युग कलियुग आहे आणि या कलियुगात अंधश्रद्धेकडे बरेचजण चालले आहेत, ख्रिस्ती मिशनरींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. खरे ख्रिश्चन आहेत ते बाटाबाटीचे काम करत नसून जे लोक बाटलेले आहेत, तेच ख्रिश्चन हे बाटाबाटीचे काम करीत असतात.

यावेळी साधक व उपासक दीक्षाही देण्यात आली. या कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. हजारो भाविक त्यात नवे भाविकही समस्या मार्गदर्शनासाठी आले होते. तसेच चरण दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी लाभली होती या सर्वांनी स्वामीजींचे चरणदर्शन घेतले.

गोवा उपपिठाचे सातही गोवा जिल्हा जिल्ह्यासहित सिंधुदुर्ग, उत्तर कन्नड पश्चिम, उत्तर कन्नड पूर्व, बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण, जोयडा, कारवार, मधील सर्व कार्यकर्ते व शिष्य, साधक, युवा, महिला सेना, हिंदू संग्राम सेना, भाविक, भक्त, हितचिंतक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

...मग कुठे जाण्याची गरज नाही !

काही भक्त माझ्याकडे समस्येसाठी येतात व एक दोन वर्षांनी समस्या सुटत नसेल तर बुवा, घाडी, भगत यांच्याकडे जातात.तिथे अवाढव्य खर्च करण्यास सांगितले जाते, तेवढा खर्च करूनही त्यांना सुख समाधान मिळत नाही.

म्हणून त्यांनाही ते दोष देतात. पण हा दोष तुमच्यातच दडलेला आहे, तो तुम्ही शोधा म्हणजे सापडेल. जर तुम्ही मनापासून श्रध्देने फळाची अपेक्षा न ठेवता जर निरपेक्ष, निरिच्छ भावनेने भक्ती केलीस कुठेही जाण्याची गरज नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT