Littering caught on CCTV in Mormugao, Goa
वास्को : मुरगाव पालिकेच्या कचरा संकलन केंद्रासमोर रात्रीच्या वेळी पार्टीतील निरनिराळा कचरा टाकत असल्याचे मुरगाव पालिकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या एका व्यक्तीला दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागला.
यापासून इतरांना धडा घेण्याची तसेच मुरगाव पालिकेने आपल्या कॅमेऱ्यांची संख्याही वाढविण्याची गरज आहे. मुरगाव पालिकेचे कुन्हा चौकातील चिकन मार्केटलगत कचरा संकलन केंद्र आहे. तेथे शहर भागातील कचरा गोळा करण्यात येऊन संकलन केले जाते. त्यानंतर तो कचरा सडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात नेला जातो.
या ठिकाणी रात्रीच्या वेळी काही केटरर्स तसेच इतर आपला कचरा प्लास्टिक पिंपातून किंवा गार्बेज बॅगेतून आणून टाकतात. त्यामुळे तेथे दुर्गंधी पसरते. पालिकेला सदर कचराप्रकरणी काही रक्कम देण्याऐवजी संबंधित व्यक्ती कचरा चारचाकी, दुचाकी वाहनांतून आणतात आणि सरार्सपणे तेथे टाकतात.
यासंबंधी दखल घेताना नगरसेवक व मुरगाव पालिका मंडळाचे कचरा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नारायण बोरकर यांनी तेथे कॅमेरा लावला व एकाला दंड ठोठावण्यात आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.