Goa’s top chef Avinash Martins Dainik Gomantak
गोवा

Anant & Radhika Wedding: अनंत-राधिकाच्या शाही विवाह सोहळ्यात गोवन फूडचा जलवा; शेफ अविनाश मार्टिन्स यांनी तयार केला खास मेन्यू

Manish Jadhav

Anant Ambani & Radhika Merchant Wedding: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबंधनात अडकले. मागील काही दिवसांपासून या विवाहसोहळ्याची धूम सुरु होती. मुंबईमधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये झालेला हा शाही विवाह सोहळा अनेक वर्ष स्मरणात राहील. अनंत आणि राधिकाच्या या शाही विवाह सोहळ्याला बॉलिवूडसह जगातील दिग्गज स्टार्संनी हजेरी लावली. विवाह सोहळ्यानंतर नवविवाहित जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. या फोटोंमध्ये दोघेही एवढे सुंदर दिसत होते की त्यांच्यावरुन नजर हटवणं मुश्किल झालं होतं.

दरम्यान, या शाही विवाह सोहळ्यातील मेन्यूही शाही होता. हा शाही मेन्यू बनवण्यासाठी खास शेफना बोलावण्यात आले होते. खासकरुन शाकाहारी मेन्यूची खूप चर्चा झाली. शाकाहारी खाद्यपदार्थ बनवण्यासाठी दिग्गज शेफ वर्जिलिया मार्टिनेज आणि गोव्याचे प्रसिद्ध शेफ अविनाश मार्टिन्स यांना बोलावण्यात आले होते. या दिग्गज शेफच्या देखरेखीखाली शाकाहारी मेन्यू बनवण्यात आला. अविनाश यांनी खासकरुन गोव्याच्या खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवून दिले. त्यांनी खास गोवन पद्धतीचे शाकाहारी पदार्थ बनवून मैफिल लुटली. अविनाश यांनी गोव्याची सुप्रसिद्ध मशरुम शागुती, ग्रील्ड स्वीट पोटॅटो, कॉर्न गॅलेट, सोल कढी, बनवले.

दक्षिण गोव्यातील बाणावली येथे शेफ अविनाश मार्टिन कॅव्हॅटिना कुसीना हे रेस्टॉरंट चालवतात. त्यांनी गोवन फूडला देशासह विदेशात प्रसिद्धी मिळवून दिली आहे. यातच अंबानीच्या शाही सोहळ्यातही त्यांनी खास आणि शाही पदार्थ बनवून उपस्थितांना अचंबित केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa PWD: सार्वजनिक बांधकाम खात्यातील कर्मचारीच असुरक्षित; खाते लोकांना काय सुरक्षा देणार? पाटकरांचा सवाल

गोवा सरकारची तिजोरी रिकामी, म्हणून EV Subsidy मिळण्यास होतोय विलंब; काँग्रेसचा आरोप

Goa Today's News Live: माडेल-मडगाव येथे घरफोडी, १ लाख रुपयांचा ऐवज लंपास

कॅसिनोमुळे वेश्‍‍या व्‍यवसाय, दारु या वाईट वृत्ती फोफावतात; सनबर्ननंतर दक्षिण गोव्‍यात आता कॅसिनोला विरोध

खाणव्याप्त भागातील ट्रक धारकांसाठी महत्वाची बातमी; ट्रकांचा ‘फिटनेस' दंड गोवा सरकारकडून रद्द

SCROLL FOR NEXT