प्रख्यात रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक (Gurunath Naik) यांचे पुण्यामध्ये निधन झाले Dainik Gomantak
गोवा

गोव्याचे प्रसिध्द रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक यांचे निधन

प्रिन्सेस कादंबरी लिहून जागतिक कीर्ती मिळविणारे मनोहर माळगावकर हे नाईक यांच्या वडिलांचे -विष्णू नाईक- यांचे जवळचे मित्र. माळगावकर यांच्याशी बालपणी झालेल्या चर्चेतूनच गुरुनाथ नाईक (Gurunath Naik) यांच्या मनात लिखाणाचे बीज रुजले.

दैनिक गोमन्तक

मराठी साहित्य क्षेत्रात जागतिक विक्रम करणारे आणि बाराशे मराठी कादंबऱ्या लिहिणारे प्रख्यात रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक (Gurunath Naik) यांचे पुण्यामध्ये निधन झाले. गुरुनाथ नाईक हे मराठीतील आघाडीचे रहस्य कथाकार होते. मुंबई (Mumbai), पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात नोकरीनिमित्त राहिलेले नाईक मूळचे गोव्याचे (Goa) होते. गोमंतकातील सत्तरीजवळचे आडवाई साखळी हे त्यांचे मूळ गाव आणि राणे हे त्यांचे मूळ आडनाव होय.

प्रिन्सेस कादंबरी लिहून जागतिक कीर्ती मिळविणारे मनोहर माळगावकर हे नाईक यांच्या वडिलांचे -विष्णू नाईक- यांचे जवळचे मित्र. माळगावकर यांच्याशी बालपणी झालेल्या चर्चेतूनच गुरुनाथ नाईक यांच्या मनात लिखाणाचे बीज रुजले. नाईक यांच्या घराण्याला स्वातंत्र्यलढ्याचीही पार्श्वभूमी आहे. साखळीच्या राणे घराण्याने पोर्तुगीजांविरुद्ध 17 बंडे पुकारली होती. नाईक यांचे आजोबा लेफ्टनंट होते. 1901 मध्ये त्यांनी बंड पुकारले.

रहस्यकथा लिहिण्यापूर्वी म्हणजे 1957 ते 1963 या काळात गुरुनाथ नाईक यांचे विविध विषयांवर लिखाण सुरू होते. या काळात त्यांनी अनेक मराठी मासिकांतून हेमचंद्र साखळकर आणि नाईक या नावांनी लिखाण केले. आकाशवाणीच्या पुणे केंद्रासाठी काही संगीतिका, तर गोवा केंद्रासाठी काही श्रुतिका त्यांनी लिहिल्या.

मराठी साहित्य क्षेत्रात जागतिक विक्रम करणारे आणि बाराशे मराठी कादंबऱ्या लिहिणारे प्रख्यात रहस्य कथाकार गुरुनाथ नाईक यांचे बुधवारी पुण्‍यात वयाच्‍या ८४व्‍या वर्षी निधन झाले. त्‍यांनी काही काळ दै. ‘गोमन्‍तक’चे साहाय्‍यक संपादक पदही भूषविले होते.

गुरुनाथ नाईक हे मराठीतील आघाडीचे रहस्य कथाकार होते. मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात नोकरीनिमित्त राहिलेले नाईक मूळचे गोव्याचे होते. गोमंतकातील सत्तरीजवळचे विठ्ठलापूर-साखळी हे त्यांचे मूळ गाव आणि राणे हे त्यांचे मूळ आडनाव होते. दैनिकांच्‍या साप्‍ताहिक आवृत्तीतील लघुकथांच्‍या माध्‍यमातून नाईक यांच्‍या लेखनाला सुरुवात झाली. सत्तरच्‍या दशकात 100हून अधिक लघुकथांनी त्‍यांनी वाचकांना आपलेसे केले. 1970 साली प्रकाशक सदानंद खाडीलकरांना ‘मृत्‍यूकडे नेणारे चुंबन’ही पहिली रहस्‍यकथा त्‍यांनी दिली. या कथेने प्रकाशकांनाही भारावून सोडले आणि मराठीत नव्‍या रहस्यकथांचा प्रवास सुरू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: वास्कोत क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, बिहारचे तिघे अटकेत; लाखोंचा मुद्देमाल जप्त

एका वर्षात चौथा मृत्यू, झोपेतच विद्यार्थ्याचा गेला जीव; BITS Pilani कॅम्पसमधील घटनेने हळहळ

Thivim MIT University: थिवी विद्यापीठासाठी 1 हजार 149 झाडे तोडणार, गोवा राज्य वृक्ष प्राधिकरणाकडून मंजुरी

Delhi Crime: आई आणि मुलाच्या नात्याला कलंक! मुलानेच आईवर केला दोनदा बलात्कार; म्हणाला, ‘मी तिला शिक्षा दिली...’

Mopa Airport: गोव्यात Air India विमानाचा मोठा अनर्थ टळला! रन-वे सोडून केला टॅक्सी-वेवरून उड्डाणाचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT