Rasika Khandeparkar Dainik Gomantak
गोवा

Rasika Khandeparkar: गोव्यातील स्वच्छता कर्मचारी रसिका खांडेपारकर यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

केंद्रीय जल शक्ती मत्रालयाचा कचरा व्यवस्थापनातील पुरस्कार प्रदान

Akshay Nirmale

Rasika Khandeparkar: गोव्यातील पिसुर्ले येथील स्वच्छता कर्मचारी रसिका खांडेपारकर यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. खांडेपारकर यांना केंद्रीय जल शक्ती मंत्रालयाचा कचरा व्यवस्थापनातील स्वच्छ सुजल शक्ती सन्मान हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

खांडेपारकर या पिसुर्ले पंचायत क्षेत्रात स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा हा सन्मान करण्यात आला आहे. पिसुर्ले पंचायतीने स्वच्छ भारत निर्मल भारत हा उपक्रम सुरू केल्यानंतर खांडेपारकर यांनी त्यात मनापासून योगदान दिले होते.

प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन, बायोड्रिगेडेबल कचऱ्याचे व्यवस्थापन तसेच गोबर्धन या योजनेत त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे.

त्याची दखल घेऊन पंचायत खात्यामार्फत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. पंचायत संचलनालयाच्या उत्तर गोवा सहाय्यक संचालक फिजओना वा सासष्टीच्या गटविकास अधिकाऱ्यांसमवेत खांडेपारकर दिल्लीला गेल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Birthday: टाइम्स स्क्वेअरवर पंतप्रधान मोदींचा गौरव! भारतीय समुदायाने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; 140 कोटी भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण

Ballaleshwar Ganpati: पालीचा बल्लाळेश्वर भक्ताच्या नावाने का ओळखला जातो? अढळ भक्तीची ही पौराणिक कथा प्रत्येक गणेशभक्ताने जाणून घ्यायलाच हवी

Goa vs Gujarat: अभिनव- सुयश अन् दर्शनचा धूमधडाका! गोव्यानं मारलं मैदान; 8 विकेट्सने गुजरातचा पराभव

Margao Stray Dogs Survey: मडगावातील भटक्या कुत्र्यांची, गुरांची संख्या कळणार; पालिकेकडून प्राणी मॅपिंग मोहिमेला सुरुवात, नागरिकांना सहकार्याचे आवाहन

Surya Gochar 2026: बँक बॅलन्स वाढणार अन् व्यवसायात मोठे ऑर्डर मिळणार! शिस्त आणि बुद्धिमत्तेचा महासंयोग; सूर्यदेवाची 'या' राशींवर होणार विशेष कृपा

SCROLL FOR NEXT