Goa New Railway Stations Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway: गोव्यात तीन नवीन रेल्वे स्थानक का केली जातायेत? कोकण रेल्वेने दिले उत्तर वाचा

Goa New Railway Stations: गोव्यात प्रस्तावित तीन नवी रेल्वे स्थानके बांधण्यासंदर्भात लोकांमध्ये गैरसमज पसरवला जात आहे. ही रेल्वे स्थानके सां जुझे द आरियल, नेवरा व मये येथे प्रस्तावित आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Three New Railway Stations Controversy Konkan Railway Clarification

सासष्टी: गोव्यात प्रस्तावित तीन नवी रेल्वे स्थानके बांधण्यासंदर्भात लोकांमध्ये गैरसमज पसरवला जात आहे. ही रेल्वे स्थानके सां जुझे द आरियल, नेवरा व मये येथे प्रस्तावित आहेत. या भागातील लोकांनी या रेल्वे स्थानकांना आपला विरोध दर्शविण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने स्पष्टीकरण दिले असून ही रेल्वे स्थानके व्यवहार्य (ऑपरेशनल) कार्यक्षमता सुधारण्यासाठीच या तीन नवीन रेल्वे स्थानकांची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

केवळ कोळसा (Coal) वाहतुकीसाठीच या रेल्वे स्थानकांची उभारणी केली जात आहे असे लोकांचे म्हणणे आहे. आम्हाला लोकांची चिंता माहीत आहे. मात्र ही नवीन रेल्वे स्थानके व्यवहार्य कार्यक्षमता सुधारण्यासाठी आहेत. कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे वाहतूक वाढली आहे. शिवाय सुटीत खास रेल्वे गाड्या सोडल्या जात आहेत. त्यामुळे काही रेल्वे गाड्यांना विलंब होत असतो. हे सर्व टाळण्यासाठी या तीन रेल्वे स्थानकांचा वापर केला जाणार आहे, असे म्हटले आहे.

कोकण रेल्वेचे म्हणणे

या स्थानकांचा वापर प्रवासी किंवा मालवाहतूक हाताळण्यासाठी नाहीत, असे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे सर व्यवस्थापक बबन घाटगे यांनी सांगितले.

सध्या कोकण रेल्वेच्या (Konkan Railway) दोन रेल्वे स्थानकांमध्ये १७ कि.मी. अंतर आहे. त्यामुळे ट्रेन क्रॉसिंगसाठी अडचण भासत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

या रेल्वे स्थानकांचा उपयोग केवळ रेल्वे ट्रेनच्या क्रॉसिंगसाठी वापर केला जाईल. प्रवासी किंवा मालवाहतुकीसाठीच्या रेल्वे स्थानकांसाठी जास्त जागेची आवश्यकता लागते. शिवाय रस्ते, माल ठेवण्यासाठी शेड, देखरेख व्यवस्था आवश्यक असते, असेही घाटगे यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT