Goa Government Chalo Panchayat Program  Dainik Gomantak
गोवा

Goa Cabinet: प्रमोद सावंत सरकारची पाच वर्ष; मंत्री जाणार पंचायत भेटीला, जाणून घ्या तुमच्या गावात कोण येणार?

Goa Cabinet Decision: विकसित भारत अंतर्गत राज्यातील मंत्र्यांचे 27 फेब्रुवारीपासून पंचायत चलो अभियान सुरु होणार

Pramod Yadav

Goa Government Chalo Panchayat Program

विकसित भारत अंतर्गत राज्यातील मंत्र्यांचे 27 फेब्रुवारीपासून पंचायत चलो अभियान सुरु होणार असून, बाराही मंत्र्यांना तालुक्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुख्यमंत्री सावंत यांच्यासह मंत्री आणि आमदार राज्यातील विविध पंचायतील दिवस व्यतीत करतील.

मंत्री गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील तसेच, यावेळी लोक उपयुक्त कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती मुख्यंत्री प्रमोद सावंत यांनी आजच्या (दि.23) मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकाराला येत्या 19 मार्चला पाच वर्ष पूर्ण होत आहेत. विकसित भारत-विकसित गोवा अंतर्गत राज्यातील मंत्री विविध पंचायतीत विविध समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील.

कोणत्या पंचायतीत कोणता मंत्री देणार भेट

मुख्यमंत्री प्रमोद सावंत - ताळगाव

विश्वजीत राणे - मुरगाव, नुवे, शिरोडा, मडकई

माविन गुदिन्हो - कळंगुट, काणकोण, पेडणे, सात आंद्रे

रवी नाईक - डिचोली, वाळपई,

सुभाष शिरोडकर - सांताक्रूज, हळदोणा, सावर्डे

रोहन खंवटे - कु़डचडे, दाबोळी, प्रियोळ, वेळ्ळी

गोविंद गावडे - सांगे, साळगाव, कु़डतरी, कुंकळ्ळी

बाबुश मोन्सेरात - वास्को, मये, मडगाव

सुदीन ढवळीकर - म्हापसा, साखळी, कुठ्ठाळी

निळकंठ हळर्णकर - फातोर्डा, फोंडा, कुंभारजुवा

सुभाष फळदेसाई - पेडणे, मांद्रे, पर्वरी, थिवी

आलेक्स सिक्वेरा - नावेली. बाणावली, केपे आणि शिवोली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Effigy Plastic Use: नरकासुर प्रतिमांसाठी प्लास्टिकचा वापर; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या डोळ्यांवर पट्टी?

Smriti Mandhana Record: विराट-रोहितला जमलं नाही ते स्मृती मानधना करणार! टी-20 क्रिकेटमध्ये विश्वविक्रम रचण्याची संधी, फक्त इतक्या धावांची गरज

Gram Panchayat CCTV Plan: गोव्यातील प्रत्येक पंचायतीवर सीसीटीव्हीची नजर! तीन आठवड्यांत प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता

Karnataka Accident: कर्नाटकात प्रवाशांवर काळाचा घाला! बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक; 4 ठार, 14 जखमी

Land Compensation: जमीन मोबदल्यासाठी 7 वर्षांची प्रतीक्षा! 15 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या; गोवा खंडपीठाचे निर्देश

SCROLL FOR NEXT