Goa Vegetable Price Dainik Gomantak
गोवा

Goa Mango & Vegetable Prices: गोव्याचा मानकुराद खातोय भाव; लिंबू, फळेही महागली, गावठी भाज्यांना वाढती मागणी

Goa Mango & Vegetable Prices: राज्यात मागील महिन्याभरापासून भाज्यांच्या दरात सतत वाढ दिसून येत आहे. बेळगावहून येणारी भाजी बरीच महागलेली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Mango & Vegetable Prices

राज्यात मागील महिन्याभरापासून भाज्यांच्या दरात सतत वाढ दिसून येत आहे. बेळगावहून येणारी भाजी बरीच महागलेली आहे. गावठी भाज्यांना बाजारात चांगली मागणी आहे, परंतु मागणी एवढा पुरवठा होत नसल्याने ग्राहकांनी बेळगावहून येणारी भाजी विकत घ्यावी लागते.

सध्या भाजीपाला तसेच फळ भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून उष्मा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे, त्यापासून बचावासाठी लोक लिंबू पाणी, सरबत, फळांचा रस, शीतपेयांकडे वळले आहेत.

त्यामुळे लिंबू व इतर फळांच्या दरातही वाढ झाली आहे. उत्तम दर्जाचे मध्यम आकाराचा लिंबू आठ रुपये प्रतिनग विकला जात आहे.

आंबे दाखल

बाजारात मानकुराद, हापूस, तोतापुरी, सेंदूरी असे विविध आंबे दाखल झाले आहेत. परंतु अजून हे आंबे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेले नाहीत. मानकुराद आंबा २५००-३००० रुपये, हापूस १ हजार, सेंदूरी २५० ते ३०० रुपये डझन दराने विकला जात आहे.

खुल्या बाजारात भाजीचे दर

कांदा- ४०, बटाटा - ४०, टोमॅटो - ५०, गाजर - ६०, फ्लॉवर ४०, भेंडी - ८०, कोबी - ४०, मिरची - ८०

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway: कोकणवासियांसाठी गुड न्यूज! मुंबई ते मडगाव विशेष गाडी जाहीर; 'या' 23 स्थानकांवर असणार थांबा, पाहा वेळापत्रक

Rajasthan Royals Sale: IPL इतिहासातील सर्वात मोठी डील! 15 हजार कोटींना विकली गेली 'राजस्थान रॉयल्स'; कोण आहे नवा मालक?

Honda: सफर गोव्याची! सर्वांचे स्वागत करणारे, मोठ्या जंक्शनचे काम करणारे 'होंडा' गाव

Mangaladitya Rajyog 2026: सूर्य-मंगळाची युती, 2 एप्रिलपासून मंगलादित्य राजयोगाचा चमत्कार; 3 राशींवर होणार धनाचा वर्षाव

Curchorem: कुडचडे सेक्स स्कँडलचा तपास आता 'क्राईम ब्रांच'कडे, नवे धागेदोरे हाती लागणार

SCROLL FOR NEXT