Goa Sports Dainik Gomantak
गोवा

Goa Sports: गोव्याची पदक संख्या घटण्याच्या मार्गावर

Goa Sports: 37 व्या राष्ट्रीय स्पर्धेत डोपिंग : राज्याच्या क्रीडा क्षेत्राला धक्का

दैनिक गोमन्तक

गोव्याने 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पदक तक्त्यात जबरदस्त मुसंडी मारताना तब्बल 92 पदकांची कमाई केली. मात्र, उत्तेजक द्रव्यसेवन चाचणीच्या (डोपिंग) प्राथमिक अहवालात दोषी आढळलेल्या 25 क्रीडापटूंमध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व केलेला खेळाडूही आहेत.

त्यामुळे कारवाईनंतर खेळाडूला शिक्षा झाल्यास यजमानांची पदकसंख्या कमी होईल. या प्रकारामुळे राज्य क्रीडा क्षेत्राला धक्का बसला आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, गोव्यातर्फे ब्राँझपदक जिंकलेला एक खेळाडू राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संस्थेने (नाडा) भारतीय ऑलिंपिक संघटनेला (आयओए) सादर केलेल्या अहवालात आहे. या खेळाडूने जिंकलेले संबंधित खेळातील ते एकमेव पदक आहे.

हा खेळाडू मूळचा गोमंतकीय नाही. तो उत्तर भारतीय असून सेना दलाच्या सेवेत असतो. ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोवा क्रीडा प्राधिकरणाने राज्य संघ निवडताना ७० टक्के गोमंतकीय आणि ३० टक्के बाहेरगावचे खेळाडू, या सूत्राला मान्यता दिली. त्यानुसार संबंधित खेळांच्या राज्य संघटनांनी संघ निवडले. हा खेळाडू थेट गोव्याच्या संघात दाखल झाला होता, त्याबाबत मुख्य प्रशिक्षक वगळता संघटनेला जास्त माहिती नाही.

संबंधित खेळाडूच्या राज्य संघटनेला डोपिंगविषयी ‘आयओए’कडून अद्याप अधिकृतपणे कळविलेले नाही. मात्र, त्या खेळाडूला कारणे दाखवा नोटीस बजावली असून स्पष्टीकरण मागविले आहे. डोपिंग अहवालात दोषी सर्व खेळाडूंचे सध्या तात्पुरते निलंबन केले आहे. सविस्तर प्रक्रियेनंतर संबंधित खेळाडूंच्या डोपिंगवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर बंदी येईल, तसेच खेळाडूचे पदकही काढून घेतले जाईल. तसे झाल्यास गोव्याची पदकसंख्या निश्चितच घटेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT