Fuel leak In Goa: पन्नास दिवसांनंतरही प्रभावी उपाययोजना नाही

Fuel leak In Goa: झुआरी इंडियन ऑईल अदानी वेन्चर कंपनीच्या भूमिगत इंधन वाहिनीला आल्तो दाबोळी परिसरात लागलेल्या गळतीचा प्रकार समोर आल्यास 50 दिवस पूर्ण होत आले.
Fuel leak In Goa
Fuel leak In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Fuel leak In Goa: झुआरी इंडियन ऑईल अदानी वेन्चर कंपनीच्या भूमिगत इंधन वाहिनीला आल्तो दाबोळी परिसरात लागलेल्या गळतीचा प्रकार समोर आल्यास 50 दिवस पूर्ण होत आले. मात्र, दाबोळी, चिखली, व्हडलेभाट परिसरात अजूनही पेट्रोल-डिझेल मिश्रित इंधन सापडत आहे.

Fuel leak In Goa
Mhadei River: म्हादईवरील कळसा-भांडुरा प्रकल्पाचे भवितव्य आता अहवालावर

आतापर्यंत कंपनीने 200 पेक्षा जास्त टँकर इंधन ताब्यात घेतले आहे, असे येथील पंच नीलम नाईक यांनी सांगितले. या परिसरात पेट्रोल -डिझेलचा दर्प येत असल्याने रहिवाशांना मूत्रपिंड व अन्य आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागेल, अशी भीती नाईक यांनी व्यक्त केली.

या कंपनीने मुरगाव बंदरातून साकवाळ येथील प्रकल्पात पेट्रोल-डिझेल हलविण्यासाठी भूमिगत इंधन वाहिनी टाकली आहे.

या वाहिनीला आल्तो दाबोळी येथे गंज लागून गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात इंधन जमिनीत झिरपते आहे. दाबोळी, चिखली, व्हडलेभाट परिसरात विहिरी, नाले व शेत जमिनीत नोव्हेंबरपासून इंधन सापडत आहे.

ही इंधन गळती समोर आल्यास 50 दिवस पूर्ण होत आले तरी अजून प्रभावी उपाययोजना आखलेल्या नाहीत. विहिरी, नाल्यात अजूनही इंधनाचा साठा आढळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com