Load Shedding in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यातही लोडशेडिंग! उद्योग चालू ठेवण्यासाठी उद्योजकांचा संघर्ष कायम

सर्वाधिक वीज दर भरूनही उद्योगांना कमीत कमी प्राधान्य मिळते आणि दररोज पाच ते अकरा तास वीज कपात सहन करावी लागते, असे उद्योजकांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यातील लहान आणि मध्यम आकाराचे उद्योग कोविड-प्रेरित मंदीनंतर पुन्हा सुरू होत असतानाच, रोजच्या वीज कपातीमुळे या क्षेत्राला आणखी एक धक्का बसला आहे. उन्हाळ्यात विजेच्या वापरात होणारी वाढ आणि राष्ट्रीय वीजटंचाई यामुळे राज्यातील उद्योगांना दैनंदिन लोडशेडिंगची गरज भासत आहे. सर्वाधिक वीज दर भरूनही उद्योगांना कमीत कमी प्राधान्य मिळते आणि दररोज पाच ते अकरा तास वीज कपात सहन करावी लागते, असे उद्योजकांनी सांगितले. (Goa’s industry struggles to power on, Gripped by load-shedding)

गोवा स्टेट इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष दामोदर कोचकर म्हणाले की, डिझेलच्या उच्च किंमतीमुळे लहान आणि सूक्ष्म औद्योगिक युनिट्सना डिझेल जनरेटर सेटवर चालवणे प्रतिबंधित होते. “आम्ही सर्वाधिक वीज दर देतो, परंतु घरगुती ग्राहक आणि हॉटेल्ससाठी लोडशेडिंग नाही मात्र उद्योगांना दररोज वीजपुरवठा खंडित केला जातो.

कोविड-19 साथीच्या आजारातून नुकत्याच बाहेर पडलेल्या छोट्या युनिट्सना पुन्हा मोठा फटका बसला आहे. तसेच त्यांचे नुकसान होत आहे,” कोचकर म्हणाले. औद्योगिक (Goa Industry) वसाहतींमध्ये वीजपुरवठा (Electricity) खंडित होणे सामान्य आहे. कमी व्होल्टेजमुळे मशिन्स खराब होत आहेत. गोव्यातील उद्योगपतींनी सातत्याने असा युक्तिवाद केला आहे की, गोव्यात उत्पादन क्षेत्राला वेगळी वागणुक दिली आहे.

उद्योगाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. “दुर्दैवाची बाब म्हणजे औद्योगिक वसाहतीमध्ये (GIDC) जीआयडीसीच्या जमिनीवर उभारण्यात आलेल्या उपकेंद्रांचा वापर घरगुती ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी केला जातो.

वेर्णा औद्योगिक वसाहत येथील उपकेंद्रातून मुरगाव, माजोर्डा, आणि फातोर्डाला वीजपुरवठा होतो. त्यामुळे जेव्हा वीज अपुरी असते तेव्हा ते उद्योगाची वीज तोडतात,” अशी माहिती कोचकर यांनी दिली. रायकर यांनी राज्य सरकारने देखभालीची आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची विनंती केली आहे. जेणेकरून वीज परिस्थिती सुधारेल. “एकीकडे दर वाढवले ​​आहेत तर दुसरीकडे वीजपुरवठा खंडित होत आहे,” असे रायकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT