Goa Electricity Dainik Gomantak
गोवा

Goa Electricity: गोव्यात विजेची मागणी वाढणार दुपटीने! औद्योगिक उत्पादनात होणार वाढ; लोह-पोलाद उद्योग आघाडीवर

Goa Electricity Demand: औद्योगिक विभागाने सादर केलेल्या अहवालात २०२० ते २०४० या कालावधीत उत्पादन क्षेत्रातील चक्रवाढ वार्षिक दर वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी १.५ ते ७ टक्क्यांपर्यंत राहील असे स्पष्ट झाले आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोव्यातील औद्योगिक उत्पादनात लक्षणीय वाढ होणार असून त्यानुसार ऊर्जेची मागणीही झपाट्याने वाढणार आहे. सरकारी अहवालानुसार २०४० पर्यंत औद्योगिक क्षेत्राची एकूण उत्पादन क्षमता २०२०च्या तुलनेत जवळपास चारपट होईल. यात सर्वाधिक वेगाने वाढ करणारा उद्योग म्हणजे लोह व पोलाद, ज्याची एकट्याची उत्पादन क्षमता सध्या ३.७३ हजार कोटी रुपयांवरून थेट ११.९७ हजार कोटींवर पोहोचणार आहे.

औद्योगिक विभागाने सादर केलेल्या अहवालात २०२० ते २०४० या कालावधीत उत्पादन क्षेत्रातील चक्रवाढ वार्षिक दर वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी १.५ ते ७ टक्क्यांपर्यंत राहील असे स्पष्ट झाले आहे. त्‍यात इतर मिश्रित औद्योगिक गट सर्वाधिक वाढ दर्शवत असून त्यांचा चक्रवाढ वार्षिक दर ७ टक्के इतका आहे. या गटातील उत्पादन १९,२१४ कोटी रुपयांपासून थेट ७४,३५४ कोटी रुपयांवर जाईल, असा अंदाज आहे.

पल्प अँड पेपर, वस्त्रोद्योग, अ‍ॅल्युमिनियम, व खत उत्पादक उद्योगांमध्येही हळूहळू वाढ होणार आहे. वस्त्रोद्योग २०२० मध्ये १.३४ हजार कोटी रुपये उत्पादन करीत होता, ते २०४० पर्यंत २.४३ हजार कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पल्प अँड पेपर उद्योगातही स्थिर वाढ होत असून चक्रवाढ वार्षिक दर २ टक्के इतका आहे.

या अहवालात सध्या निष्क्रीय असलेल्या सिमेंट व क्लोर-अल्कली उद्योगांच्या आकडेवारीचा समावेश नसल्यामुळे त्यांच्या वाढीचा अंदाज अस्पष्ट आहे. तथापि, ऊर्जेच्या वाढत्या गरजांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ऊर्जा पायाभूत सुविधा, ग्रीन ऊर्जा व औद्योगिक धोरणांचे पुनरावलोकन होणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे.

औद्योगिक क्षेत्राच्या मागणीचा विचार करता, सरकारने सौरऊर्जा, जैवऊर्जा व सीबीजीसारख्या पर्यायांकडे लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता असल्याचे जाणकारांचे मत आहे. कारण वाढत्या उत्पादनासोबतच ऊर्जेचा समतोल आणि शाश्वत विकासही तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे.

‘हरित गोवा’साठी त्वरित निर्णयाची गरज

उद्योगांसाठी आवश्यक असलेली ऊर्जा जर हरित स्रोतांतून मिळाली, तर राज्याच्या कार्बन फूटप्रिंटवरही सकारात्मक परिणाम होईल. त्यामुळे औद्योगिक वृद्धीसोबतच ‘हरित गोवा’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी धोरणात्मक निर्णय त्वरित घेणे अत्यावश्यक आहे.

पर्यावरणस्नेही औद्योगिकीकरणाचे आव्हान

आगामी दोन दशकांत गोव्यातील औद्योगिक उत्पादनात मोठी वाढ अपेक्षित असून त्यानुसार ऊर्जा वापरातही मोठी झेप होणार आहे. या पार्श्वभूमीवर, ऊर्जेचा स्रोत ग्रीन ठेवण्याचे व पर्यावरणस्नेही औद्योगिकीकरणाचे आव्हान राज्य सरकारपुढे उभे ठाकले आहे. औद्योगिक धोरण, ऊर्जा धोरण आणि पर्यावरण धोरण यांचा समन्वय साधणे ही काळाची गरज बनली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali 2025: ..पूर्वी सुकलेल्या गवतापासून नरकासूर बनायचा, गुराख्याच्या सेवेसाठी समर्पित केलेला गोडवा पाडवा; गोव्यातील दिवाळी

Goa Accident: पेडणेजवळ थरार! महिंद्रा कार खांबावर आदळली, गाडीचा चक्काचूर; नवरा-बायको गंभीर जखमी

Goa Politics: 'देवाची शपथ घेऊनसुद्धा काँग्रेसचे आमदार भाजपसोबत गेल्याचा इतिहास'! आतिषी यांची सडेतोड मुलाखत; Watch Video

Diwali 2025: दिवाळी तोंडावर तरी दुकानदार, विक्रेते चिंतेत! ‘ऑनलाईन’ खरेदीचा फटका; घोंगावतेय पावसाचे सावट

Goa Live News: पंचांना अपात्र ठरवण्याचा आदेश रद्द!

SCROLL FOR NEXT