Panaji: पणजीतील जिवंत माणसाला दाखवले 'मृत'! वीज खात्याचा भोंगळ कारभार; मंत्री ढवळीकर देणार स्पष्टीकरण

Panaji News: वीज खात्यातील गलथान कारभार आता पुढे आला आहे. बसवाणी कोलकर (रा. सांतिनेज-पणजी) हे २०२० मध्ये अपघात झाल्यामुळे अंथरुणाला खिळून आहेत.
Panaji man declared dead alive
Panaji man declared dead aliveDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: वीज खात्यातील गलथान कारभार आता पुढे आला आहे. बसवाणी कोलकर (रा. सांतिनेज-पणजी) हे २०२० मध्ये अपघात झाल्यामुळे अंथरुणाला खिळून आहेत. परंतु वीज खात्याच्या कागदावरील नावाच्या मागे इंग्रजीत ‘लेट’ हा शब्द लावला गेल्याने त्याला मृत म्हणून घोषित केल्याचा आरोप बसवाणी यांच्या कुटुंबाचा आहे.

त्यांच्या जागी पत्नीला नोकरी मिळाली नाही आणि त्यांना पेन्शनही मिळत नाही. हे पाचजणांचे कुटुंब बसवाणी यांच्या आईच्या पेन्शनवर विसंबून आहे. मात्र, बसवाणी जिवंत असतानाही ‘मृत’ दाखविण्यामागचे कारण काय, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका खासगी यूट्यूब चॅलनमुळे हा प्रकार पुढे आल्याने वीज खाते खडबडून जागे झाले आहे. याबाबत आता वीजमंत्री सुदिन ढवळीकर मंगळवारी (ता.१५) पत्रकार परिषद घेऊन त्याविषयी माहिती देणार आहेत. बसवाणी यांची पत्नी खासगी नोकरी करीत होती; परंतु नवरा अंथरुणावर असल्याने त्याची सुश्रुषा करण्याकरिता त्यांना नोकरी सोडावी लागली.

Panaji man declared dead alive
Thivim: आनंदात काढला ग्रुप फोटो, ठरला अखेरचा! लईराई जत्रोत्सवातील चेंगराचेंगरीत थिवीतील तिघांचा मृत्यू; गावावर शोककळा

वीज खात्यात सोमवारी (ता.१४) दिवसभर या वृत्ताविषयी चर्चा सुरू होती. २०२० मध्ये बसवाणी यांची पत्नी गीता यांनी वीज खात्यात पतीच्या जागी काम मिळावे म्हणून अर्ज केले होते, त्यावर जे उत्तर पत्राद्वारे पाठविण्यात आले आहे. त्यात बसवाणी यांच्या नावामागे ‘लेट’ हा शब्द लावण्यात आला. हा शब्द कसा काय आला आहे, तो एक संशोधनाचा भाग आहे. २०२० मध्ये बसवाणी यांचा अपघात झाल्यापासून ते अंथरुणावर पडले आहेत. २०२२ मध्ये उपजिल्हाधिकाऱ्यांनी जो अहवाल दिला आहे, त्यात ते आजारी असल्याचे म्हटले आहे.

Panaji man declared dead alive
Thivim: 'सचिव पंचसदस्यांच्या अंगावर धावून आले'! थिवी पंचायतीत मनमानी कारभार; सरपंचांसह इतरांनी वाचला तक्रारींचा पाढा

कुटुंब आर्थिक विवंचनेत

वीज खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा काहींच्या मते बसवाणी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. तर कर्मचाऱ्यांच्या मते त्यांना अपघात झाला होता. बसवाणी यांच्या आजारामुळे गेल्या सहा वर्षांपासून हे कुटुंब आर्थिक समस्येला तोंड देत आहे. मात्र, या वृत्ताची दखल वीज खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी घेतली असून, त्याविषयी ते मंगळवारी स्पष्टीकरण देणार असल्याने त्यातून नेमके काय प्रकरण आहे, याचा उलगडा होईल असे दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com