Goa's industrial estate experience 40 hours of power outage every month say businessman in the state  Dainik Gomantak
गोवा

Goa Industries: औद्योगिक वसाहतींना वीज खात्‍याचा ‘शॉक’, महिना 40 तास बत्ती गुल; उद्योजकांनी व्यक्त केली चिंता

Goa Industries: राज्‍यातील औद्योगिक वसाहतींमध्‍ये दर महिन्‍याला २५ तास वीज खंडित होणार असे वीज खाते कळवते, पण प्रत्यक्षात ४० तास वीज खंडित करते.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Industries: राज्‍यातील औद्योगिक वसाहतींमध्‍ये दर महिन्‍याला २५ तास वीज खंडित होणार असे वीज खाते कळवते, पण प्रत्यक्षात ४० तास वीज खंडित करते. याचा फटका औद्योगिक उत्पादकता व उत्पादनांवर होतो, अशा शब्‍दांत उद्योजकांनी चिंता व्यक्त केली. ही स्‍थिती केवळ वेर्णा औद्योगिक वसाहतीपुरती मर्यादित नाही तर राज्यभरातील औद्योगिक वसाहतींमध्‍ये हेच चित्र असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.

गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या उत्पादकता आणि औद्योगिक विकास समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्‍यात आली. या बैठकीला समितीचे अध्यक्ष गौतम राज, सहअध्यक्ष नितीन देसाई, सदस्य डॉ. जेनिफर लेविस कामत, चेंबरचे महासंचालक संजय आमोणकर, संचालक किरण बाळ्ळीकर यांच्‍यासह मान्‍यवर उपस्थित होते. जनित्रांच्या माध्यमांतून वीजनिर्मिती केली तर २५ रुपये प्रतियुनिट खर्च येतो. प्रश्‍‍न सोडवण्यासाठी उद्योजकांचे गट स्थापन करण्याच्या संकल्पनेवरही विचार कऱण्यात आला. किमान पाच उद्योजकांनी गट स्थापन कऱण्याचे ठरविण्यात आले.

कचऱ्यासाठी मोठे शुल्क

घातक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी असलेल्या ‘फोंडा एन्व्हार्यो केअर’कडून अवाजवी शुल्क आकारले जात असल्याची बाबही बैठकीत चर्चेला आली. गोवा राज्‍य प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोवा चेंबरला पत्र पाठवून सदस्य उद्योजकांना हा कचरा ‘फोंडा एन्व्हार्यो केअर’ या आस्थापनाकडे पाठवावा अशी सूचना केली आहे. त्या पत्राच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेवेळी हा मुद्दा समोर आला. सदर शुल्‍क राज्याबाहेरील कंपन्यांपेक्षा जास्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

SCROLL FOR NEXT