Goa Electricity Dainik Gomantak
गोवा

Goa Electricity Department: दोन वर्षांत 5 हजार कोटींची कामे! वीज खात्याकडून निविदा जारी; वीजमंत्र्यांची माहिती

Goa Power Projects: वीज खात्याने मागील दोन वर्षांत राज्यात वीज क्षेत्रातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांसाठी ५ हजार कोटींच्या कामांसाठी निविदा जारी केल्या आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: वीज खात्याने मागील दोन वर्षांत राज्यात वीज क्षेत्रातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांसाठी ५ हजार कोटींच्या कामांसाठी निविदा जारी केल्या आहेत. वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी यासंदर्भात माहिती दिली असून ते म्हणाले की, बार्देश तालुक्यातील वीज समस्या सोडवण्यासाठी ३५० कोटींचे सबस्टेशन अपग्रेडेशनचे कामही सध्या सुरू करण्यात आले आहे.

वीजमंत्री सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) म्हणाले की, मी वीज मंत्री झाल्यापासून विभागातील योजनांची अंमलबजावणी करण्यावर भर दिला आहे. भूमिगत वीजवाहिन्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. बार्देश तालुक्यात वीज समस्या सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात येत आहेत. तसेच, स्मार्ट मीटरसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून आता त्यांची चाचणी केली जाणार आहे. यामुळे वीज वितरण अधिक कार्यक्षम होईल.

राज्यातील वीज पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी आणि बार्देशसह राज्यातील वीज तुटवडा सोडवण्यासाठी वीज खात्याचे प्रयत्न सुरू असून, भविष्यातील योजना कार्यान्वित करण्यावर भर असल्याचे मंत्री ढवळीकरांनी सांगितले.

ईव्ही चार्जिंग स्टेशन्समध्ये वाढ

दोन महिन्यांत राज्यभरात २० ईव्ही चार्जिंग स्टेशन बसवण्यात आले असून पुढील तीन महिन्यांत त्यांची संख्या आणखी वाढवली जाणार आहे. पर्यावरणपूरक (Environment) वाहतूक प्रोत्साहनासाठी ईव्ही सबसिडीही वेळेत देण्यात येत असल्याची माहिती मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT