Goa Electricity Department: वीजेच्या लपंडावाने दक्षिण गोव्यात जनता त्रस्त

Electricity Issue At South Goa: शेल्डे पॉवर स्टेशनमध्ये मोठा बिघाड झाल्याने अनेक तास वीजपुरवठा खंडित झाला
Electricity Issue At South Goa:  शेल्डे पॉवर स्टेशनमध्ये मोठा बिघाड झाल्याने अनेक तास वीजपुरवठा खंडित झाला
Electricity Junction Poles Canava
Published on
Updated on

दक्षिण गोव्याचे रहिवासी अलीकडच्या काही दिवसांत या जिल्ह्यातील सततच्या वीजपुरवठ्याच्या समस्यांमुळे त्रस्त झाले आहेत. अनियमित वीजपुरवठ्यामुळे केवळ दैनंदिन जीवनच विस्कळीत होत आहे असे नाही, तर घरगुती उपकरणांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे स्थानिक संतप्त झाले आहेत आणि त्यांनी त्वरित कृतीची मागणी केली आहे. रविवारपासून ही समस्‍या अधिकच तीव्र झाल्‍याचे स्‍थानिकांनी सांगितले.

रविवारी दुपारनंतर परिस्थिती गंभीर टप्प्यावर पोहोचली. शेल्डे पॉवर स्टेशनमध्ये मोठा बिघाड झाल्याने अनेक तास वीजपुरवठा खंडित झाला. या घटनेवर लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक रहिवाशांनी राज्याच्या वीज क्षेत्रांतील पायाभूत सुविधांबद्दल निराशा व्यक्त केली आहे.

अनेक आठवड्यांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. पण रविवारच्या ब्लॅकआउटमुळे आम्ही अगदीच अडचणीत आलो व मूलभूत सुविधाही वापरणे कठीण झाले. अशा परिस्थितीत आम्ही काय करायचे, असा सवाल वेळ्‍ळी येथील एका गृहिणीने केला.

वेळ्‍ळीचे आमदार क्रुझ सिल्वा आणि कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सांगितले की, त्यांनी या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि वीज विभागाशी ते बोलले आहेत.

आमदार सिल्वा यांनी वीज विभागावर जोरदार टीका केली, तर लॉरेन्स यांनी प्रभावित पॉवर सबस्टेशन्सवर भेडसावू लागलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कोणते उपाय हाती घेण्यात आले आहेत त्याबद्दल सांगितले. वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी नुकतेच वीजपुरवठ्याच्या समस्यांना मुसळधार पाऊस आणि झाडांच्या फांद्या पडल्यामुळे झालेल्या नुकसानाला जबाबदार धरले होते.

Electricity Issue At South Goa:  शेल्डे पॉवर स्टेशनमध्ये मोठा बिघाड झाल्याने अनेक तास वीजपुरवठा खंडित झाला
Goa Electricity Department: नगरगावात विजेचा 'खेळ मांडला'

सहा तास वीज खंडित

रविवारी दुपारपासून सुमारे सहा तास कुंकळ्ळीपासून बाळ्ळी, फातर्पा आणि काणकोणपर्यंत वीजपुरवठा खंडित राहिला. यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. शेल्डे वीज केंद्रामध्ये मोठा बिघाड झाल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. रात्री ८.३० वा.च्या सुमारास काणकोणसह अन्य काही भागांतील वीजपुरवठा सुरळीत झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com