Priyanka Gandhi Dainik Gomantak
गोवा

'गोव्यात काँग्रेसची सत्ता आल्यावरच गोव्याची संस्कृती टिकून राहील'

गोव्यात (Goa) काँग्रेसची (Congress) सत्ता आल्यावरच गोव्याची संस्कृती टिकून राहील, तसेच गोव्याचा आवाज राहील, गोवा हा गोव्याच्या जनतेच्या हातात राहील.

दैनिक गोमन्तक

गोव्यात (Goa) काँग्रेसची (Congress) सत्ता आल्यावरच गोव्याची संस्कृती टिकून राहील, तसेच गोव्याचा आवाज राहील, गोवा हा गोव्याच्या जनतेच्या हातात राहील. काँग्रेस पक्ष हा लोकांचा आवाज ओळखतो काँग्रेस पक्ष जो काय निर्णय घेतो तो गोव्याच्या लोकांच्या हितावह असतो. तेव्हा आम्हाला आता बरोबर काम करायचे आहे. हातात हात घालून काम करणार तेव्हाचा आम्ही येणारी विधानसभा निवडणूक जिंकणार असे प्रतिपादन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा (Priyanka Gandhi) यांनी चिखली दाबोळी येथे काॅग्रेस कार्यकर्ते मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस दिनेश गुंडुराव, केंद्रीय मंत्री पी चिदंबरम (P Chidambaram), गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar), काँग्रेसचे नेते दिगंबर कामत (Digambar Kamat), आलेक्स सिक्वेरा, आलेक्स रेजिनाल्ड, फ्रान्सिस्को न्युनीस व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी कॅप्टन विरीयाटो यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला. प्रियंका खान यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

पुढे बोलताना गांधी यांनी, इथे खूप पक्ष आले आहेत ज्यांची मानसिकता हीच आहे की समाजापेक्षा आपल्या पार्टीला मोठं करणं. गोव्यात बदल घडवायचा असेल, विकास घडवून आणायचा असेल तर जनतेची कामं आणि विकासाच्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या पार्टीलाच मत द्या. गोवा पर्यावरण नष्ट करणाऱ्या राजकीय पक्षांना मतदान करु नका असे आवाहन केले. दिगंबर कामत यांनी काँग्रेस पक्ष महत्त्वाचे निर्णय घेतो. आम्हाला बंगाली पार्टी नको, तसेच दिल्लीची पार्टी नको. आम्हाला पाहिजे काँग्रेस पार्टी जी गोव्यासाठी वावरते. सध्याचे सरकार लोकांचा आवाज दाबून टाकत आहे. त्यांना यापुढे राज्य करण्याचा कोणताच हक्क नाही. तेव्हा येणारे सरकार हे काँग्रेसचेच सरकार असणार असा आम्ही ठाम निर्णय घेऊया असे त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले. या वेळी कॅप्टन विरीयाटो यांनी आपले विचार मांडले व काँग्रेस प्रवेश दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. उपस्थितांचे स्वागत क्लेट डिसोजा यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT