सासष्टी : गोव्यातील (Goa) युवकांनी आगामी निवडणुकीसाठी पर्यांवरणचा मुद्दा उपस्थित केला ते एका अर्थाने बरेच झाले. एरव्ही निवडणुकांच्या वेळी सरकारी नोकऱ्या, भ्रष्टाचार हे मुद्दे उपस्थित करतात. या वेळी पर्यांवरण नष्ट करणारे राजकारणी व राजकीय पक्षांना मतदान करु नका असे कॉंग्रेसच्या नेत्या (Congress) प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यानी मडगावी (Margao) एमसीसी सभागृहात युवकांना संबोधताना आवाहन केले. या कार्यक्रमाला सेव्ह गोवा, आमचें गोंय मोले कॅंपेन या संघटनाचे युवा व ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी प्रियांका गांधी याना अनेक प्रश्र्न विचारले.
राजीव गांधी यानी या पुर्वीच गोव्यातील तीन रेखीय प्रकल्पांना विरोध दर्शविला आहे. कॉंग्रेस पक्षाचा वेगळा निर्णय होऊ शकत नाही असे गांधी यानी सांगितले. कॉंग्रेस पक्ष गोव्यातील वन क्षेत्राचे रक्षण करण्यास वचनबद्ध आहे. तसेच देशातील नद्यांचे राष्ट्रीयकरणासही विरोध आहे असेही गांधी यानी सांगितले. सद्याच्या सरकारला लोकांच्या भावनांची कदर नाही.त्याच प्रमाणे सरकार लोकांचा, पर्यावरणाचा, वन्य जिवनाचा आदर करीत नाही असेही गांधी यानी टिका केली. कॉंग्रेस पक्ष महिला व युवकांच्या हाती नेतृत्व देण्यास उत्सुक असल्याचे सुतोवाचही त्यांनी केले. कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड ल़ॉरेन्स यानी सर्वांचे स्वागत केले. तर गाब्रिएला डिक्रुझ व सरिता फर्नांडिस यानी पर्यावरण संबंधीचे जाहीरनामे प्रियांका गांधी याना सादर केले.
प्रियंका गांधींचा TMC वर नाव न घेता निशाणा
तृणमूल काँग्रेस गोव्यामध्ये यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. गोवा काबिज करण्यासाठी ममता दीदींचे सर्व विरोधी पक्षांना एकत्र घेऊन भाजपविरोधात निवडणूक लढवण्याची रणनीती आखत आहेत. यासाठी त्यांनी सुरुवातीला दिल्लीत जाऊन सोनिया गांधी, राहुल गांधी यांची देखील भेट घेतली. परंतु काँग्रेसकडून हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने दीदींनी महाराष्ट्रात येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांची देखील भेट घेतली. देशाच्या तिसऱ्या आघाडीची सुरुवात दीदी गोव्यातून करणार का? अशी चर्चा सुरू झाली. गोव्यामध्ये तृणमूल काँग्रेसने काँग्रेसचेच नेते आणि कार्यकर्ते यांना फोडून आपल्या पक्षात घेतले. यावर काँग्रेसच्या नेत्यानी ममता दीदी या भाजपलाच मदत करत असल्याची टीका केली. याच मुद्द्याला धरून प्रियंका गांधी यांनी आज गोव्यात येऊन तृणमूल काँग्रेसचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्या म्हणाल्या, "इथे खूप पक्ष आले आहेत ज्यांची मानसिकता हीच आहे की समाजापेक्षा आपल्या पार्टीला मोठं करणं. गोव्यात बदल घडवायचा असेल, विकास घडवून आणायचा असेल तर जनतेची कामं आणि विकासाच्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या पार्टीलाच मत द्या", असे त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.