Alex Sequeira Dainik Gomantak
गोवा

Goa News : देशाच्या विकासात गोव्याचेही योगदान : आलेक्स सिक्वेरा

Goa News : मडगावात सुरक्षारक्षकांचा सत्कार

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News : सासष्टी, भारताने जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्व क्षेत्रामध्ये चांगली प्रगती केली असून देशाच्या विकासात गोव्याचेही योगदान महत्त्वाचे असल्याचे पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी सांगितले.

७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हाधिकारी संकुलात ध्वजारोहण केल्यावर ते बोलत होते.

भारताबद्दलची विश्र्वासार्हता इतर देशांमध्ये वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने सर्वच क्षेत्रामध्ये भरारी मारलेली आहे. पंतप्रधान मोदी महिला, युवक, शेतकरी व गरिबांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करीत आहेत असेही सिक्वेरा यांनी सांगितले.

यावेळी अजित वेळीप व संदेश गावकर या सुरक्षा रक्षकांचा सत्कार करण्यात आले. या सोहळ्याला नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, स्वातंत्र्य सैनिक, नागरिक व सरकारी अधिकारी उपस्थित होते.

समान नागरी कायदा हे गोव्याचे वैशिष्ट्य

गोव्याने पर्यटन, क्रीडा या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती केली आहे. गोव्यामध्ये औद्योगीक व कृषी क्षेत्रामध्ये नवीन योजना कार्यान्वित केल्या आहेत. समान नागरी कायदा हे गोव्याचे वैशिष्ट्य असल्याचे सिक्वेरा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT