Goa Shack Business : शॅक मालक अजूनही व्यवसाय परवाना मिळण्याच्या प्रतीक्षेतच; व्यावसायिकांत नाराजी

Goa Shack Business : ‘पीसीबी’ला शुल्क भरूनही मुभा नाही
Goa Shack
Goa Shack Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Shack Business : पणजी, ज्या शेकडो शॅक मालकांनी आपले शॅक्स डिसेंबर २०२३ पर्यंत कार्यान्वित केले होते, ते अजूनही २०२४ मध्ये गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून 'कन्सेंट टू ऑपरेट' मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

एका शॅक मालक संघटनेचा दावा आहे की, काही शॅक मालकांना परवानगी मिळाली आहे. तर इतर शॅक मालक संघटनांचा दावा आहे की, बहुतेक शॅक मालकांना जीएसपीसीबी कडून परवानग्या मिळालेल्या नाहीत. त्यामुळे व्यावसायिकांत नाराजी आहे.

गेल्या वर्षी नवीन शॅक धोरण लागू झाल्यापासून, गोव्यात पर्यटन हंगाम सुरू असताना अनेक शॅक मालकांचे नुकसान झाले आहे. नवीन शॅक धोरणानुसार शॅक्सला अनेक परवानग्या मिळणे आवश्यक होते. प्रदीर्घ प्रक्रियेनंतर, शॅक्स डिसेंबर २०२३ पर्यंत कार्यान्वित झाले.

Goa Shack
Kala Academy Goa - कला अकादमीला खरोखरच गळती? मंत्री गोविंद गावडे म्हणतात...| Gomantak TV

परंतु शॅक मालक संघटनेचा दावा आहे की ‘जीएसपीसीबी’ ला भरघोस शुल्क भरूनही, मंडळाने गोव्यातील शेकडो शॅक्ससाठी ''कन्सेंट टू ऑपरेट'' जारी केले नाही.

शॅक मालक संघटनेचे गोव्याचे आणखी एक अध्यक्ष, क्रुझ कार्दोझो यांनी सांगितले, की बहुतांश शॅक मालकांना जीएसपीसीबी कडून कनसेन्ट टू ओपरेट संमती मिळालेली नाही. परंतु आमच्या काही शॅक चालकांना मंडळाकडून संमती मिळाली आहे.

माझ्या बाबतीत, मी जीएसपीसीबी कडून संमतीसाठी अर्ज केला होता, परंतु माझा अर्ज नाकारण्यात आला. कारण मी पंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र जोडले नव्हते. केळशी पंचायतीने ना हरकत प्रमाणपत्र दिले तर आम्हाला जीएसपीसीबीकडून परवानगी मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

अनेक शॅक मालकांनी मागील वर्षी शॅक वाटप कालावधीत 'कन्सेंट टू ऑपरेट' मिळविण्यासाठी जीएसपीसीबीला १५,००० शुल्क भरले होते.

आता जानेवारी २०२४ मध्ये आम्हाला कार्यान्वित करण्यासाठी संमती मिळणे बाकी आहे.

-मॅन्युएल कोलासो, अध्यक्ष उत्तर गोवा पारंपरिक शॅक मालक संघटना

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com