Goa News |  
गोवा

Goa News: कुठ्ठाळीतील पाणी समस्या सोडविणार- अँथनी वाझ

Goa News: कुठ्ठाळी भागातील पाणी समस्या सोडण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे वाझ त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमन्तक

Goa News: कुठ्ठाळी किंवा केळशी कोमुनिदादने पाण्याची टाकी बांधण्यासाठी सुमारे एक हजार चौरस मीटरचा भूखंड दिल्यास कुठ्ठाळी भागातील पाण्याची समस्या सोडविण्यास मदत होईल, असे कुठ्ठाळीचे आमदार अँथनी वाझ यांनी सांगितले. कुठ्ठाळी भागातील पाणी समस्या सोडण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पाणी समस्येबाबत तक्रारी येऊ लागल्याने आमदार वाझ यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यासह बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी कुठ्ठाळीच्या जिल्हा पंचायत सदस्य मेर्सियना वाझ, कुठ्ठाळीच्या सरपंच सेनिया परेरा, अभियंते विश्वंभर भेंडे आदी उपस्थित होते.

गावातील घरांची संख्या वाढत आहे. काही घरे उंच भागात असल्याने तेथे पाणीपुरवठा होत नाही यासंबंधी चर्चा करण्यात आली. पाणी साठविण्यासाठी अतिरिक्त टाकी बांधल्यास ही समस्या दूर होण्यास मदत होणार असल्याचे आमदार वाझ यांनी सांगितले. त्याचप्रमाणे तेथे एक टाकी विनावापर असल्याचेही ते म्हणाले.

10 ऐवजी 3 एमएलडी पाणी-

कुठ्ठाळीसाठी 10 एलएमडी पाणी मंजूर केले असताना फक्त तीन एमएलडी पाणी मिळते. त्यामुळे पाण्याची कमतरता निर्माण होत आहे, असे सरपंच परेरा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT