National Games Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

National Games Goa 2023: अभिमानास्पद! सांगे येथील बाबू गावकरकडून गोव्याला पहिले सुवर्ण

लेझर रन प्रकारात 600 मीटर धावणे व शूटिंग यांचा समावेश होता.

किशोर पेटकर

National Games Goa 2023: 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याला पहिले सुवर्णपदक मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये मिळाले. नेत्रावळी-सांगे येथील 22 वर्षीय बाबू गावकर याने पुरुषांच्या लेझर रन प्रकारात अव्वल कामगिरी नोंदवत पहिला क्रमांक पटकावला.

लेझर रन प्रकारात 600 मीटर धावणे व शूटिंग यांचा समावेश होता. स्पर्धा फोंडा क्रीडा संकुलात झाली.क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी राज्यासाठी पहिले सुवर्णपदक जिंकणाऱ्या बाबू गावकर याचे अभिनंदन केले आहे. अवघ्या दोन-अडीच महिन्यातील प्रशिक्षणाच्या जोरावर बाबू याने सुवर्णपदकाला गवसणी घातली.

पूर्वी मॅरेथॉन, मिनी मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या बाबू याची ही पहिलीच प्रमुख मॉडर्न पेंटॅथलॉन स्पर्धा आहे. केपे सरकारी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतलेला बाबू आंतरमहाविद्यालयीन पातळीवरील 1,500 मीटर शर्यतीतील माजी सुवर्णपदक विजेता आहे.

सुवर्णपदक कामगिरीचे श्रेय बाबू याने आई-वडील, गोवा मॉडर्न पेंटॅथलॉन संघटनेचे पदाधिकारी, प्रशिक्षक नीलेश नाईक यांना दिले आहे. बाबू याचे वडील अर्जुन गावकर हे ट्रॅक्टर मॅकेनिक असून त्यांची स्वतःची गॅरेज आहे. शिवाय ते बागायती शेतकरी आहेत. आई अपर्णा गृहिणी असून बहीण अर्पिता शिक्षण घेते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अल्पवयीन रशियन मुलींकडून फुलांची विक्री, पर्यटकांसोबत फोटोसाठी आग्रह; हरमल किनाऱ्यावरील Video Viral

दिवसाढवळ्या चॉपरने केला हल्ला, 4 लाख पळवले; सबइन्स्पेक्टरने जीपमधून उडी मारून चोरांना पकडले; 33 वर्षांपूर्वी वास्कोत घडलेला थरार

Betul: महिला, माजी सरपंचांमध्ये खडाजंगी! बेतुल मोबाईल टॉवरचा विषय चिघळला; आगोंद ग्रामसभेत तणाव

Goa Live News: पेडणे पोलिसांची अंमली पदार्थांवर मोठी कारवाई; नायजेरियन नागरिकाकडून 1.05 लाखांचे ड्रग्ज जप्त

MGP: 'आम्ही युती धर्म पाळणार आहोत'! ढवळीकरांचे स्पष्टीकरण; उमेदवारांबद्दल म्हणााले की..' Watch Video

SCROLL FOR NEXT