Susana Sardo Dainik Gomantak
गोवा

Goan Music: पोर्तुगीज प्राध्यापिका गोव्यात आली आणि पारंपरिक संगीत ऐकून थक्क झाली; समृद्ध ‘साऊंडस्केप’ आणि पाश्चिमात्य प्रभाव

Goan Traditional Music: सुसान पोर्तुगालमधील प्रसिद्ध वांशिक संगीतशास्त्रज्ञ आहे. गोव्यातील संगीत, त्याची मुळे, त्याची उत्क्रांती आणि त्याचा सामाजिक परिणाम यावर ती अभ्यास करत आहे.

Sameer Panditrao

Susana Sardo About Goan Music

संगीत गोव्यातील दैनंदिन जीवनाचा एक निश्चितच एक अविभाज्य भाग आहे. जेव्हा कोणी गोमंतकीय संगीतातील सूर ऐकतो तेव्हा त्यातील आवाज आणि नादांमधील वेगळेपण त्याच्या मनात आपोआपच कुतूहल निर्माण करते. सुसान सारडोच्या मनातही असेच कुतूहल निर्माण झाले आणि या कुतुहलाची उत्तरे ती शोधू लागली. सुसान पोर्तुगालमधील प्रसिद्ध वांशिक संगीतशास्त्रज्ञ आहे. गोव्यातील संगीत, त्याची मुळे, त्याची उत्क्रांती आणि त्याचा सामाजिक परिणाम यावर ती अभ्यास करत आहे. ती म्हणते, 'गोव्यात सर्वत्र संगीत आहे.’ 

संगीत केवळ ध्वनी म्हणून नव्हे तर एक शिस्तबद्ध प्रक्रिया म्हणून होणाऱ्या अभ्यासाला 'एथनोम्युजिकोलॉजी' असे नाव आहे. सुसान सांगते, 'संगीत कोण बनवते आहे, ते का बनवले जात आहे, कुठल्या प्रकारचे संगीत ते सादर करीत आहेत आणि त्यांच्या त्या कामगिरीचा लोकांवर आणि समाजावर काय परिणाम होतो आहे हे समजून घेण्यात आम्हाला (एथनोम्युजिकोलॉजिस्टना) रस असतो.'

हा अभ्यास म्हणजे केवळ ध्वनिफितींचा संग्रह नाही तर संगीताचे संशोधनात्मक विश्लेषण करून व त्याचा समाजावर झालेला परिणाम समजून, जगात सकारात्मक परिणाम घडवून आणण्याच्या उद्देशाने होणारे ते काम आहे. 

पोर्तुगाल येथील एव्हेरो विद्यापीठात ‘एथनोम्युजिकोलॉजी’ या विषयाची प्राध्यापक असलेली आणि गोवा विद्यापीठाच्या जे. एच. कुन्हा रिवारा चेअरसाठी व्हिजटिंग रिसर्च प्राध्यापिका असलेली सुसान‌ 1987 मध्ये, तिच्या पीएचडीच्या प्राथमिक कामासाठी पहिल्यांदा गोव्यात पोहोचली.

तिला  एथनोम्युजिकोलॉजीवर लक्ष केंद्रित करायचे होते आणि ती गोव्यातील वातावरण समजून घेऊन इथे संशोधन करता येईल अशा प्रकारच्या संगीताच्या शोधात होती. ती सांगते, 'त्यावेळी मला गोव्यातील संगीत हे धर्म, वर्ग, जात, स्थळ यांच्याशी जोडलेले असल्याचे जाणवले. या संगीताचे स्तर वेगळे होते- जसे की पाश्चात्य संगीत, ज्याचा अभ्यास त्याच्या संगीतकारांनी कधीच केला नव्हता.

अनेक संगीतकार तियात्राशी जोडलेले होते. त्याशिवाय मौखिक परंपरा असलेले मांडो, देखणी, फुगडी, धालो, खेळ, मुसळ यासारखे पारंपरिक संगीतदेखील होते- या सर्व संगीत परंपरा वेगवेगळ्या लोकांद्वारे, वेगवेगळ्या संदर्भात, विविध कोकणी बोलींमधून सादर केल्या जात होत्या.'

सुसानने आपले लक्ष मांडोवर केंद्रित केले, कारण गोव्याच्या कॅथोलिक समुदायाशी तिचे चांगले संबंध आहेत. ज्यावेळी तिने पहिल्या मांडो संगीताच्या कार्यक्रमाला हजेरी लावली, त्यावेळी गोव्याच्या पारंपरिक संगीतावर असलेला पाश्चिमात्य प्रभाव पाहून ती थक्क झाली होती.

मी माझ्या वरिष्ठांना लागलीच लिहिले की मला इथे काम करायचे नाही कारण इथं अभ्यास करण्याजोगे काहीही नाही. मी जर भारतात असेन तर माझ्या कानाला वेगळे असे काहीतरी ऐकण्याची गरज आहे- परंतु हे नाही. हे पूर्णपणे वसाहती पाश्चात्य संगीत आहे. याचा मला अभ्यास करायचा नाही.’

पण त्याच वेळी तिच्या मनात इतरही प्रश्न उपस्थित झाले. मांडोमधील कोरस हा युरोपमधील आधुनिक कोरसप्रमाणे का आहे? कोकणी भाषेत गायन चाललेले असताना त्यात युरोपियन सौंदर्यशास्त्राचा अवलंब का करण्यात येत होता? गायन पोर्तुगीज भाषेत का नाही? वगैरे....

पण हळूहळू सुसानच्या लक्षात आले की गोमंतकीयांच्या समस्या, दुःख, दैनंदिन जीवन मांडण्यासाठी वसाहतकर्त्यांच्या लक्षात न येता मांडोचा कलात्मक वापर एक साधन म्हणून केला गेला होता. युरोपियन सौंदर्यशास्त्राचा वापर करून कोकणीमध्ये गायल्या जाणाऱ्या गीतांची प्रशंसा वसाहतवादी केवळ संगीताच्या संदर्भात करू शकत होते.

त्यानंतर सुसान मांडो सादर करणाऱ्या गोव्यातील अनेक कुटुंबासोबत काम करू लागली. तिने मांडो महोत्सवालाही हजेरी लावली, जो तिला रोचक वाटला. ती म्हणते, 'संगीत गोव्याच्या समाजाचे प्रतिबिंब कसे आहे हे जाणून घेण्यापेक्षा संगीत समाजाच्या उभारणीला कशी मदत करते हे जाणून घेण्यात मला स्वारस्य आहे.'

सुसान गोव्याच्या समृद्ध ‘साऊंडस्केप’चे कौतुक करते. त्यामुळे गोवा भारताच्या इतर भागापेक्षा वेगळा ठरतो असे तिला वाटते. गोव्यातील कार्यक्रमांमध्ये एक आवश्यक घटक म्हणून संगीताचा समावेश अवश्य होत असतो आणि हे संगीत पोर्तुगीज ते लॅटिनपर्यंत संगीताच्या विविध शैलींचे छान मिश्रण असते. हे जगाच्या इतर भागात दुर्मीळ आहे असे ती म्हणते.

सुसान‌ सध्या गोव्याच्या संगीतावर फिल्डवर्क करत आहे. एथनोम्युजिकोलॉजीच्या चष्म्यातून या संगीताचे सखोल आकलन विकसित करण्यासंबंधी ती विद्यार्थ्यांना शिक्षितही करत असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सुनेत्रा पवारांनी घेतली पद अन् गोपनीयतेची शपथ, महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला 'उपमुख्यमंत्री'; PM मोदींकडून शुभेच्छा VIDEO

Operation Herof2: बलुचिस्तानमध्ये क्वेटासह 10 शहरांवर बलोच बंडखोरांचा ताबा, पाकिस्तानी सैनिक चौक्या सोडून पळाले; 10 ठार VIDEO

Pakistan Economy Crisis: "मुनीर अन् मी पैसे मागतो तेव्हा..." शहबाज शरीफ यांनी मांडली आर्थिक गुलामगिरीची व्यथा; परकीय कर्जाच्या अटींपुढे झुकला पाकड्यांचा कणा

Congo Landslide: 'कांगो'मध्ये निसर्गाचा महाप्रलय! मुसळधार पावसानं डोंगराचा कडा कोसळून 200 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये मुलांचाही समावेश VIDEO

Goa Elections 2027: प्लॅनिंग तयार, आता मैदानात उतरा! भाजप अध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिला 2027 च्या विजयाचा 'महामंत्र'; विधासभा निवडणुकीचं फुंकलं रणशिंग

SCROLL FOR NEXT