Monte Festival: ‘मोन्त फेस्टिवलमध्ये' पसरणार 700 वर्ष जुन्या वाद्याची जादू; सतरा तारा छेडणार राजस्थानी धून

Kamayacha Music: आंब्यांच्या लाकडापासून तयार केलेलं हे दुर्मिळ वाद्य ऐकणं अनेकांसाठी पहिलावहिला अनुभव ठरेल
Rajasthani Music
Rajasthani MusicDainik Gomantak
Published on
Updated on

Monte Festival Goa: संध्याकाळच्या नयनरम्य नैसर्गिक पार्श्वभूमीवर दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या ‘मोन्त फेस्टिवल’ची २३वी आवृत्ती येत्या ३१ जानेवारीला पुन्हा रसिकांच्या भेटीला येत आहे. यावेळी राजस्थानच्या मंगनियार समुदायाची मंत्रमुग्ध करणारी लय प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. आंब्यांच्या लाकडापासून तयार केलेलं हे दुर्मिळ वाद्य ऐकणं अनेकांसाठी पहिलावहिला अनुभव ठरेल.

हे अनोखे वाद्य बनवण्यासाठी शेळीचे आतडे, तांबे आणि स्टील यांसारख्या विविध सामग्रीचा वापर केला जातो, यामध्ये असलेल्या एकूण १७ तारांची सुरेल धून छेडली जाते. मंगनियार कलाकार डेरे खान सात शतकांहून अधिक काळ त्यांच्या कुटुंबाद्वारे वाजवले जाणारे हे अनोखे वाद्य प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. हे वाद्य म्हणजे राजस्थानमधील मंगनियार समुदायाच्या समृद्ध सांगीतिक वारशाचा पुरावा आहे.

डेरे खान यांचे वडील लतीफ खान यांनी या अनोख्या वाद्याच्या सखोल महत्त्वावर भर दिला. ते म्हणतात की राजस्थानमधील त्यांच्या गावात पिढ्यानपिढ्या जपलेलं हे एकच वाद्य आहे.

Rajasthani Music
Monte Festival: नृत्य, गीत, संगीताचा बहार! मोन्त फेस्टिवल; तारखा जाणून घ्या

हे वाद्य बनवण्याची कला सध्या लोप पावत चालली आहे, आणि म्हणूनच ते या वाद्याची विशेष काळजी घेतात. या वाद्यात बकरीच्या आतड्यांचा वापर केला जातो म्हणून त्याची काळजी घ्यावी लागते असेही ते म्हणलेत.

मोन्त फेस्टमधील मंगनियार परफॉर्मन्समध्ये मोर्चांग, ​​मुरली, भापंग, अल्गोजा, हार्मोनिअम आणि खरताल यांसारख्या इतर पारंपारिक राजस्थानी वाद्यांचाही समावेश असेल. नुसरत फतेह अली खान यांच्या गाण्यांच्या सादरीकरणात या अनोख्या वाद्याचा मोठा सहभाग असतो.

मोन्त संगीत महोत्सवात प्रामुख्याने अस्सल राजस्थानी लोकसंगीतावर लक्ष केंद्रित करणारं हे वाद्य नक्कीच प्रेक्षकांसाठी खास ठरेल. ओल्ड गोवा येथील ‘चॅपल ऑफ नोसा सेनोरा दी मोन्त’ येथे‌ ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी असे तीन दिवस नृत्य-गीत-संगीताचा हा बहारदार महोत्सव पार पडणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com