37th National Games Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

37th National Games Goa: गोव्याच्या श्रुंगी, संजना जोडीचा ‘ब्राँझ’ धमाका

37th National Games Goa: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यजमानांच्या खात्यात एकूण 30 पदके, बीच फुटबॉलमध्ये यश नक्की

दैनिक गोमन्तक

37th National Games Goa: श्रुंगी बांदेकर व संजना प्रभुगावकर या गोव्याच्या जलतरणपटूंनी लौकिकास साजेशी कामगिरी बजावताना 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याला जलतरणात दोन ब्राँझपदके जिंकून दिली. त्यामुळे यजमानांची आता स्पर्धेतील एकूण पदकसंख्या 30 झाली आहे.

कांपाल येथील जलतरण तलावात श्रुंगीने महिलांच्या 400 मीटर मेडली शर्यतीत तिसरा क्रमांक पटकावताना 5 मिनिटे 13.69 सेकंद वेळ नोंदविली. बंगळूर येथे प्रशिक्षण घेणाऱ्या श्रुंगीचे हे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सलग दुसरे पदक ठरले.

तिने गतवर्षी गुजरातमध्ये झालेल्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 200 मीटर मेडलीत ब्राँझपदक जिंकले होते. संजनाने घरच्या जलतरण तलावात सलग दुसरे पदक जिंकले. दोन दिवसांपूर्वी तिने महिलांच्या 200 मीटर फ्रीस्टाइल शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते.

मंगळवारी 16 वर्षीय दुबईत प्रशिक्षण घेणाऱ्या संजनाने महिलांच्या 200 मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत 2 मिनिटे 23.64 सेकंद वेळेसह ब्राँझपदकाची कमाई केली.

पुरुष संघ अंतिम फेरीत

गोव्याच्या पुरुष फुटबॉल संघाने मंगळवारी बीच फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. उपांत्य लढतीत त्यांनी लक्षद्वीपला हरविले. सुवर्णपदकाच्या लढतीत गोव्यासमोर केरळचे आव्हान असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT