Goa Weather Update: यंदा हिवाळा लांबण्याची शक्यता!

Goa Weather Update: पणजी काही दिवसांपासून वातावरणात होणारे बदल तसेच वाढलेला उष्मा यांमुळे राज्यात सोमवारी वा मंगळवारी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली होती.
Goa Weather Update
Goa Weather UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Weather Update: पणजी काही दिवसांपासून वातावरणात होणारे बदल तसेच वाढलेला उष्मा यांमुळे राज्यात सोमवारी वा मंगळवारी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली होती. त्यानुसार राज्यातील काही भागांत आज (मंगळवारी) दुपारी 4 नंतर पाऊस पडला.

Goa Weather Update
Goa Casino Raid: ईडीची कारवाई सीसी टीव्ही फुटेज तसेच दस्तावेज ताब्यात

साखळी, सत्तरी, धारबांदोडा, पेडणे या भागांत पावसाने हजेरी लावली. राजघानीतही सायंकाळी 7 च्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडला. मात्र, पुढील काही दिवस वातावरणात मोठे बदल घडण्याची शक्यता नसल्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे.

वातावरणात बदल

वातावरणात सातत्याने होणारे बदल पाहता, राज्यात यंदा थंडी पडायला आणखी काही आठवडे वाट पाहावी लागणार असल्याची शक्यता हवामानतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. कारण मागील दोन दिवस तुरळक प्रमाणात पडलेला पाऊस तसेच यंदाच्या पावसाचा परतीचा प्रवास तसेच इतर बाबी पाहता हिवाळा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे, तसेच नोव्हेंबरच्या पूर्वार्धात हिवाळ्याच्या गुलाबी थंडीला सुरवात होऊ शकते. एनआयओ शास्त्रज्ञ एम. रमेश कुमार यांच्यामते, ऑक्टोबर, नोव्हेंबर हा मॉन्सूनोत्तर कालखंड मानला जातो; परंतु येत्या काही दिवसांत राज्यातील कमाल तापमानात काही प्रमाणात घट होणार आहे.

Goa Weather Update
37th National Games Goa: काही तासांच्या पावसाचा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला फटका

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) वतीने मंगळवारी (ता. ३१) नोव्हेंबर महिन्याचा अंदाज जाहीर करण्यात आला. त्यामध्ये कमाल व किमान तापमानासह नोव्हेंबर महिन्यात देशातील पावसाची स्थिती कशी असेल याबाबत अंदाज देण्यात आला आहे. त्यानुसार यंदा नोव्हेंबर महिन्यात देशातील किमान तापमान सरासरीच्या वर जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सुद्धा किमान तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात थंडीचे प्रमाण कमी राहणार आहे.

किमान तापमानाबरोबर राज्यातील कमाल तापमानात सुद्धा सरासरीपेक्षा वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. तर देशात मध्य भारत आणि अति उत्तरेकडील भागात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत कमी नोंदले जाऊ शकते. नोव्हेंबर महिन्याच्या काळात दक्षिण भारतातील राज्यात अधिक पाऊस पडतो. तर ‘आयएमडी’च्या १९७१ ते २०२० दरम्यानच्या दीर्घकालीन सरासरीनुसार दक्षिण भारतात नोव्हेंबर महिन्यात ११८.७ मिलिमीटर इतका पाऊस पडतो. दरम्यान यंदा नोव्हेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज पाहता, दक्षिणेकडील बऱ्याच भागांसह, ईशान्य, पूर्व मध्य आणि पश्‍चिमेकडील काही भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस अपेक्षित आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com