Goan student got placement in Amazon Dainik Gomantak
गोवा

गोमंतकीय तरुणाने अॅमेझॉनमध्ये मिळवली 44 लाखांची नोकरी

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या रोहित कार्तिकची कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये दिमाखदार कामगिरी

दैनिक गोमन्तक

पणजी : गोमंतकीय तरुण कोणत्याच गोष्टीत मागे नाहीत हे एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने दाखवून दिलं आहे. एनआयटीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने अॅमेझॉनमध्ये भरभक्कम पगाराची नोकरी मिळवत गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. रोहित कार्तिक असं या विद्यार्थ्याचं नाव असून त्याच्या कामगिरीबद्दल सर्वत्र त्याचं कौतुक केलं जात आहे.

गोव्यातील (Goa) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी असलेल्या रोहित कार्तिकला अॅमेझॉनमध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली आहे. तब्बल 44 लाख रुपयांचं वार्षिक पॅकेज अॅमेझॉनने रोहितला देऊ केलं आहे. पर्वरीत राहणाऱ्या रोहित कार्तिकने कॉलेजमध्ये झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये अॅमेझॉन (Amazon) या आंतरराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी पटकावली आहे.

एनआयटीच्या विद्यार्थ्याला एवढं मोठं पॅकेज मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं बोललं जात आहे. रोहित सध्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतो आहे. 2010 मध्ये स्थापन झालेल्या एनआयटीमध्ये सर्वाधिक पॅकेजची नोकरी (Job) मिळवणारा रोहित पहिला विद्यार्थी ठरला आहे. कार्तिकचं शिक्षण मे महिन्यात पूर्ण होणार असून त्यानंतर तो अॅमेझॉनमध्ये दाखल होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jofra Archer Yorker: स्पीड आणि स्विंगचा बादशाह! आर्चरचा खतरनाक 'यॉर्कर' अन् फलंदाज थेट जमिनीवर Watch Video

VIDEO: ना भरजरी साडी ना मेकअप! साऊथची 'ब्युटी क्वीन' साई पल्लवीचा 'IFFI' मध्येही पारंपरिक लूक, अभिनेत्रीच्या सौंदर्याची होतेय चर्चा

Goa Cable Issue: ..अखेर मार्ग मोकळा! वीज खांबांवरील केबल्स कापल्या जाणार; गोवा खंडपीठाचा स्थगितीस नकार

Bicholim Water Crisis: गोव्यातील 'या' भागावर घोंघावतेय पाणीसंकट! जलवाहिनी गळतीमुळे वाढला धोका; हजारो लिटर पाणी वाया

VIDEO: गोव्यात रशियन कुटुंबाकडून बेकायदेशीर 'टॅक्सी व्यवसाय'; यांना कोणाचा 'आशीर्वाद'? स्थानिकांचा सवाल

SCROLL FOR NEXT