अ‍ॅमेझॉनवर नामांकित कंपन्यांचे एसी अत्यंत कमी किमतीत; पहा काय आहेत ऑफर?

पंखे, एअर कंडिशनरला वाढती मागणी पाहून अनेक कंपन्यांनी सेल, डिस्काउंट ऑफर्स जाहीर केल्या आहेत.
Amazon Summer Sale
Amazon Summer SaleDainik Gomantak
Published on
Updated on

Amazon Summer Sale: आता उन्हाळ्याला सुरुवात झाली असून गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळावा, यासाठी सर्व जण आता पंखे, कूलर, एसी इत्यादी गोष्टींचा आधार घेत आहेत. यामुळे या गोष्टींची खरेदी वाढली आहे. पंखे, एअर कंडिशनरला वाढती मागणी पाहून अनेक कंपन्यांनी सेल, डिस्काउंट ऑफर्स जाहीर केल्या आहेत. सध्या अ‍ॅमेझॉनवर (Amazon) नामांकित कंपन्यांचे एसी अत्यंत कमी किमतीत, वेगवेगळ्या ऑफर्समध्ये खरेदी करता येणार आहेत. (ACs of reputed companies on Amazon at very low prices)

Amazon Summer Sale
बाणावलीत भरवणार जनता दरबार

खालील AC वर मिळत आहे ऑफर

1. लिव्ह प्युअर (Livpure) 1.5 टन 5 स्टार वाय-फाय इन्व्हर्टर स्प्लिट एसीची किंमत 52,999 रुपये आहे; पण अ‍ॅमेझॉनवर हा एसी डिस्काउंटवर (Discount) तुम्हाला 29,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. वीज बचतीसाठी या एसीला 5 स्टार मिळाले आहेत.

2. टीसीएल (TCL) 1.5 टन 5 स्टार वाय-फाय एआय अल्ट्रा - इन्व्हर्टर स्प्लिट एसी तुम्हाला अ‍ॅमेझॉनवर डिस्काउंटमध्ये 31,999 रुपयांना मिळेल. या एसीची किंमत 50,990 रुपये आहे. याशिवाय या एसीवर 4910 रुपयांची एक्स्चेंज ऑफरही आहे.

3. सॅमसंग (Samsung) 1.5 टन 5 स्टार, वाय-फाय इनॅब्लिड इन्व्हर्टर स्प्लिट एसीची लॉंच किंमत 67,990 रुपये आहे. हा एसी अ‍ॅमेझॉनवर 41,490 रुपयांना उपलब्ध आहे. या एसीवर 26,500 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. याशिवाय एचडीएफसी बॅंकेच्या (HDFC Bank) ऑफर्सही आहेत. या बॅंकेच्या क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास तात्काळ 1500 रुपये डिस्काउंट मिळेल. त्याशिवाय 4910 रुपयांची एक्स्चेंज ऑफरही या एसीसाठी आहे.

4. एलजी (LG) 1.5 टन 5 स्टार एआय ड्युएल इन्व्हर्टर वाय-फाय स्प्लिट एसीची लॉंचिंग प्राइस 56,490 रुपये आहे; पण अ‍ॅमेझॉनवर हा एसी 44,490 रुपयांना उपलब्ध आहे. या एसीवर 12 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळत असून, याशिवाय 4910 रुपयांची एक्स्चेंज ऑफरही (Exchange Offer) ग्राहकांना मिळणार आहे. यामुळे ग्राहकांना पैशांची बचत करून आपल्या आवडीचा एसी खरेदी करता येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com