टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी एकमेव भारतीय

अदानी समूहाचे गौतम अदानी यादीत 12व्या स्थानावर आहेत.
Mukesh Ambani
Mukesh Ambani Dainik Gomantak

जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या हुरुन (Hurun) ग्लोबल रिच लिस्ट 2022 मध्ये, रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी हे एकमेव भारतीय आहेत ज्यांचा टॉप-10 मध्ये समावेश आहे. वाढत्या संपत्तीच्या बाबतीत गौतम अदानी यांची बरोबरी नाही. त्यांच्या संपत्तीत दररोज कोट्यवधी रुपयांची भर पडत आहे.

Mukesh Ambani
Indian Railways: रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी आणले 'बुरे दिन', तिकीटातील सवलत बंद

अंबानींची संपत्ती $103 अब्ज
हुरुनच्या यादीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची संपत्ती $103 अब्ज (सुमारे 7,812 अब्ज रुपये) आहे. गेल्या एका वर्षात त्यांची संपत्ती 20 अब्ज डॉलरने वाढली आहे. यासह, ते जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत 9 व्या क्रमांकावर आहेत.

Mukesh Ambani
Paytm रिझर्व्ह बँकेच्या रडारवर; पेटीएमचा इश्यु प्राईस 72 टक्क्यांनी घसरला

गौतम अदानी
अदानी समूहाचे गौतम अदानी (Gautam Adani) हे हुरुनच्या यादीत 12व्या स्थानावर असले तरी त्यांनी एका वर्षात सर्वाधिक संपत्ती वाढवली आहे. त्यांची एकूण संपत्ती $81 अब्ज (सुमारे 6,143 अब्ज रुपये) आहे. बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, गेल्या एका वर्षात त्यांची संपत्ती 49 अब्ज डॉलरने वाढली आहे.

इलॉन मस्क अव्वल स्थानावर कायम
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या हुरुनच्या यादीत टेस्लाचे (Tesla) संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क अव्वल स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती $205 अब्ज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com