Vasco Carnival 2022 Dainik Gomantak
गोवा

वास्को कार्निवलमध्ये झळकली गोव्याची संस्कृती

वास्को कार्निव्हल समिती आयोजित कार्निव्हल चित्ररथ मिरवणूक, किंग मोमोची राजवट, आज हजारो लांकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली.

दैनिक गोमन्तक

वास्को: वास्को कार्निव्हल समिती आयोजित कार्निवलचित्ररथ मिरवणूक, किंग मोमोची राजवट, आज हजारो लांकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली. जिल्हाधिकारी रूचिका कटियाल यांनी झेंडा दाखवल्यानंतर कार्निवलला (Carnival) सुरूवात झाली. त्या या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच यावेळी त्यांच्यासमवेत प्रमुख अतिथी म्हणून तियात्र अकादमीचे अध्यक्ष मेनिनो फर्नाडिस, विशेष आमंत्रित म्हणून कोंकणी चित्रपट कलाकार जाॅन डिसिल्वा, वास्को कार्निवल समिती अध्यक्ष जयंत तारी, सरचिटणीस फ्रान्सिस्को राॅड्रीगीस, खजिनदार डिनीज डिमेलो व इतर मान्यवर उपस्थित होते.

सेंट अँड्र्यू चर्च जवळील लिना हॉटेल जंक्शन कडून ही चित्ररथाची मिरवणूक संध्याकाळी साडेचार वाजता सुरू झाली. या महोत्सवाला स्थानिक उत्सवप्रेमी सहित देशविदेशातील पर्यटकांनी मजा लुटली. संगीताच्या तालावर नृत्य करीत मिरवणूक हीरालाल ठक्कर हाऊस जवळून येथील स्वातंत्रपथ मार्गावरून दामोदर मंदिराकडून, रेल्वे स्थानकाजवळील जोशी चौकाकडून सरळ आयओसी जंक्शन जवळ फ्लोट परेडची सांगता झाली. ही मिरवणूक पहाण्यासाठी स्वातंत्रपथ मार्गाच्या दुतर्फा लोकांची गर्दी जमली होती. अनेक देशविदेशातील पर्यटक रंगीबेरंगी कपडे परिधान करून मजा लुटताना दिसत होते.

गोमंतकातील निसर्गरम्य सौंदर्याचे दर्शन घडवणारे पर्यावरणाचे जनत करण्यासाठी झाडांची कत्तल करू नका, वन्य प्राण्याचे रक्षण करा, कृषि संस्कृती, गोव्यातील पारंपारिक व्यावसायिक, कोरोना डॉक्टर, परिचारिका, पोलीस यंत्रणेने केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे चित्ररथ होते. त्या शिवाय वेशभूषा स्पर्धेतील विविध स्पर्धक लोकांचे आकर्षण ठरले. दीड वर्षानंतर यंदा कार्निवल महोत्सवाचा तरुण तरुणी तसेच मुले व वृध्दांनी आनंद लुटला. मिरवणुकीचा मार्ग, पताका, फलक व दिव्यांनी सुशोभित केली होती.

कार्निवल मिरवणुकीत सहभागी झालेल्या चित्ररथांमध्ये पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या चित्ररथांबरोबर, गोमंतकीय निसर्ग सौंदर्याचे दर्शन घडवणारे चित्ररथ, तसेच गोव्याच्या जंगलातील वाघांबरोबरच इतर वन्यप्राण्यांवर आधारित चित्ररथ, राज्यातील कृषी संस्कृती, मत्स्य संस्कृती गावडा बांधव व कोळी बांधवांच्या संस्कृतीच दर्शन घडवणारे चित्ररथही सहभागी झाले होते. राज्यातील विकासकामाांमुळे राज्यातील निसर्ग व पर्यावरणाचे कसे नुकसान होऊ लागले आहे, त्याचे दर्शन घडवणारे चित्ररथही मिरवणुकीत होते. हिंदी चित्रपट गीतांबरोबरच 'मारिया पिकाशे' आदी कोकणी गाण्यांचाही चित्ररथांवरील संगीतासाठी वापर करण्यात आला होता. त्या संगीताच्या तालावर देश-विदेशी पर्यटक थिरकताना दिसत होते.

खास करून देशी-विदेशी पर्यटकांनी (Tourists) कार्निवलसाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. चित्ररथ मिरवणूक झाल्यानंतर मूरगाव नगरपालिकेसमोर उभारण्यात आलेल्या रंगमंचावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT