Goa Cashew GI Tag Dainik Gomantak
गोवा

Goa Cashew GI Tag: गोव्याच्या काजूला मिळाला GI टॅग

काजू उत्पादकांच्या प्रलंबित मागणीवर निर्णय

Akshay Nirmale

Goa Cashew GI Tag: गोव्यातील काजूची खास ओळख संरक्षित करण्यासाठी काजू उत्पादकांच्या प्रलंबित मागणीवर कृती करत राज्य सरकारने 'गोवन काजू'ला GI टॅग देण्याची घोषणा केली आहे.

गोव्याच्या उद्योग, व्यापार, वाणिज्य संचलनालयाच्या संचालक स्वेतिक सचान यांच्या हवाल्याने राज्यातील इंग्रजी प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.

सचान यांनी म्हटले आहे की, GI टॅगमुळे गोव्याच्या काजूची प्रतिष्ठा आणि विक्री क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल. त्याचा फायदा संपूर्ण काजू उद्योगाला चालना मिळण्यात होईल. पणजीममध्ये वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट (ओडीओपी) संपर्क कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

सचान म्हणाल्या की, “गोव्यातील विविध हस्तकला, ​​कला आणि सांस्कृतिक वारसा ठळक करण्याच्या सामायिक उद्दिष्टाच्या अनुषंगाने, राज्य सरकार, इन्व्हेस्ट इंडियाच्या सहकार्याने, 'युनिटी मॉल' सुरू करणार आहे.

गोव्याच्या उत्पादनांसाठी हे खास स्थळ असेल. 'युनिटी मॉल'मध्ये केवळ 'एक जिल्हा एक उत्पादन' असे नाही तर तर स्थानिक हस्तकलेची विस्तृत श्रेणी देखील प्रदर्शित करण्यात येईल.

दरम्यान, गोव्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असलेली चार उत्पादने बेबिंका, मानकुराद आंबा, सात शिऱ्यांची भेंडी आणि आगाशी येथील वांगी जीओग्राफिकल इंडिकेशन (GI) रजिस्ट्रीच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाली आहेत.

जीआय टॅग मिळविण्याच्या प्रक्रियेतील हा अंतिम टप्पा आहे. या उत्पादनांना अधिकृतपणे GI टॅग मिळेल.

जर्नलमध्ये प्रकाशनाच्या तारखेपासून 90 दिवसांत या उत्पादनांना अधिकृतपणे GI दर्जा प्राप्त होईल. 91 व्या दिवसापासून ही उत्पादने नोंदणीकृत मानली जातील आणि GI प्रमाणपत्र त्वरित जारी केले जाईल.

गेल्या काही काळापासून या उत्पादनांना जीआय टॅग मिळावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या चार उत्पादनांपैकी बेबिंका ही गोवन मिठाई आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT