Goa Accident News Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: गोंयकार आणि दिल्लीकरांचे कुत्र्यावरुन जुंपले भांडण, महिलेने गमावला जीव; कार अंगावर घालत 10 मीटर नेले फरफटत

Mandrem Accident News: जुनासवाडा-मांद्रे येथे घडलेल्या एका प्रकरणात मारियाफेलिझ फर्नांडिस नामक एका स्थानिक महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे

Akshata Chhatre

मांद्रे: सध्या गोव्यात येणारे पर्यटक आणि स्थानिकांमध्ये बराच संघर्ष पाहायला मिळतोय. शुक्रवारी (दि. २१) रोजी जुनासवाडा-मांद्रे येथे घडलेल्या एका प्रकरणात मारियाफेलिझ फर्नांडिस नामक एका स्थानिक महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पाळीव कुत्र्यांच्या वाढलेल्या उपद्रवामुळे दिल्लीमधील रहिवासी आणि स्थानिक महिला यांच्यात संघर्ष झाला, त्यानंतर एक गाडी येऊन महिलेला धडकली आणि तिचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मारियाफेलिझ ही महिला शहाळ्याची विक्री करून घर चालवायची. त्यांच्या घराजवळ एक दिल्लीतील कुटुंब कुत्र्याला फिरवायला घेऊन यायचं. दिल्लीमधील राशिवाशांचा कुत्रा आणि मारियाफेलिझ यांच्या दोन कुत्र्यांमध्ये भांडण व्हायचे आणि हीच रोजची कटकट नको म्हणून मारियाफेलिझ आणि त्यांच्या मुलाने दिल्ल्लीतील कुटुंबाला त्यांच्या कुत्र्याला आवर घालायला सांगितलं होतं.

याप्रकरणातून त्यांच्यात भांडण जुंपलं आणि दिल्लीतील कुटुंबाने मारियाफेलिझ हिला केसांना पकडत खाली ढकललं, मारियाफेलिझ हीच मुलगा मदतीला धावून आला आणि स्थानिकांच्या मदतीने त्यांनी तिला खुर्चीवर बसवले.

या वादानंतर दिल्लीतील कुटुंब कुत्र्याला घेऊन निघून गेले असता एक गाडी भरधाव वेगाने मारियाफेलिझ हिच्या दिशने आली आणि तिला धडक दिली. या गाडीची धडक जबरदस्त असल्याने मारियाफेलिझ हिला गाडीने दहा मीटर अंतरावर फरफटत नेले, गाडीचे चाक अंगावरून गेल्याने महिलेचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

या घटनेनंर स्थानिकांनी पोलीस स्थानकाबाहेर जमाव केला. गाडीचालकाने पोलिसांजवळ आत्मसमर्पण केले आहे आणि दीपन राजू बत्रा याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. या प्रसंगामुळे स्थानिक कठोर कारवाईची मागणी करत आहेत. पर्यटक आणि स्थानिकांमधील हा किनारी वाद आता शिगेला पोहोचला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

Double Murder Case: रक्षाबंधनाच्या तोंडावर रुडकीत दुहेरी हत्याकांड! भावानेच दोन सख्ख्या बहिणींची गोळ्या झाडून केली हत्या; काळजाचा ठोका चुकवणारा थरार

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

SCROLL FOR NEXT