Sourav Ganguly Car Accident: सौरव गांगुली यांच्या कारचा अपघात; थोडक्यात बचावले 'दादा'

Sourav Ganguly Accident: एका लॉरीने गांगुलीच्या ताफ्याला अचानक ओव्हरटेक केले, कार चालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे हा अपघात झाला.
Sourav Ganguly Car Accident
Sourav Ganguly AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Sourav Ganguly Car Accident

पश्चिम बंगाल: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या कारचा अपघात झाला आहे. वर्धमान येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असताना गुरुवारी हा अपघात झाला.  दुर्गापूर एक्स्प्रेस वेवर एका लॉरीने गांगुली यांच्या कारला अचानक ओव्हरटेक केल्याने हा अपघात झाला, सुदैवाने गांगुली यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

गांगुली यांची कार दुर्गापूर एक्स्प्रेस वेवरून जात असताना दंतनपूरमध्ये हा अपघात झाला. दंतनपूरजवळ, एका लॉरीने गांगुलीच्या ताफ्याला अचानक ओव्हरटेक केले, कार चालकाने अचानक ब्रेक लावला. यामुळे गांगुली यांच्या वाहनाच्या मागे असलेल्या गाड्या एकमेकांवर आदळल्या.

Sourav Ganguly Car Accident
Mulgao: मुळगाव खाणीची होणार संयुक्त पाहणी! डिचोली उपजिल्हाधिकाऱ्यांकडून नोटीस जारी

या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही मात्र, गांगुली यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे. वर्धमान विद्यापीठात जाण्यापूर्वी गांगुलीला सुमारे 10 मिनिटे रस्त्यावर थांबावे लागले. मात्र, या अपघातानंतरही त्यांनी या सोहळ्यासाठी हजेरी लावली.

सहभागी झाला. कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थी आणि मान्यवरांशी संवाद साधला आणि भारतीय क्रिकेटच्या भविष्याविषयी चर्चा केली. शांत स्वभाव आणि नेतृत्वासाठी गांगुली ओळखले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com