Zilla Panchayat polls Goa Dainik Gomantak
गोवा

Goa ZP Elections: गोवा जि. पं. निवडणुकांचे बिगुल वाजले! 20 डिसेंबरला मतदान; राज्यात तात्काळ आचारसंहिता लागू

Zilla Panchayat voting date: निवडणूक आयोगाने मतदानापासून ते मतमोजणीपर्यंतचा संपूर्ण कार्यक्रम विस्तृतपणे मांडला

Akshata Chhatre

Goa ZP election date: गोव्यातील आगामी जिल्हा परिषद (जि. प.) निवडणुकांचे वेळापत्रक राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) शनिवार (दि.२९) अधिकृतपणे जाहीर केले आहे. या घोषणेमुळे संपूर्ण गोव्यामध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेसाठी आता जोरदार तयारी सुरू झाली आहे. राजधानी पणजी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने मतदानापासून ते मतमोजणीपर्यंतचा संपूर्ण कार्यक्रम विस्तृतपणे मांडला.

तात्काळ आचारसंहिता लागू

निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच, उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायत कार्यक्षेत्रात 'आदर्श आचारसंहिता' तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे. या नियमांमुळे आता शासनाला कोणताही मोठा धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही किंवा विकासकामांची नवी घोषणा करता येणार नाही.

प्रशासकीय यंत्रणा आता पूर्णपणे निवडणुकीच्या कामात गुंतणार आहे. राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना आता आचारसंहितेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

नामनिर्देशन प्रक्रिया आणि माघार

जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना १ डिसेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत आपले नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहेत. अर्ज भरण्यासाठी ही ९ दिवसांची मुदत ठेवण्यात आली आहे. त्यानंतर, १० डिसेंबर रोजी दाखल झालेल्या अर्जांची सखोल छाननी केली जाणार आहे.

या छाननीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांना आपले अर्ज मागे घेण्यासाठी ११ डिसेंबर हा एक दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे. या दिवशी निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.

२० डिसेंबर रोजी मतदान, २२ डिसेंबरला निकाल

गोव्याच्या ग्रामीण सत्तेचे भविष्यात कोण नेतृत्व करणार, हे २० डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानामध्ये निश्चित होणार आहे. ग्रामीण मतदारांनी लोकशाहीच्या या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.

मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, अवघ्या दोन दिवसांनी, म्हणजेच २२ डिसेंबर रोजी मतांची मोजणी केली जाईल आणि निवडणुकीचे अंतिम निकाल जाहीर होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बर्च प्रकरणानंतर झारखंडला पळून गेलेला संशयित सापडला, महिन्यानंतर ‘ऑपरेशनल मॅनेजर’ ताब्यात; महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता

Tuyem Hospital: '100 कोटी खर्चून बांधलेले हॉस्पिटल का सुरु नाही'? पेडण्‍यात उद्रेक; तुये इस्पितळ कृती समितीचे साखळी उपोषण

Chimbel Protest: चिंबलवासीयांचा आक्रोश! आमदार, जिल्हा पंचायत सदस्य, सरपंचांच्या घरांवर मोर्चा; युनिटी मॉलविरोधात फुंकले रणशिंग

Goa Assembly Session: 5 दिवसीय हिवाळी अधिवेशन! विरोधकांची लागणार कसोटी; हडफडे, चिंबल आंदोलनवरुन सरकारला घेरण्याचे आव्हान

Horoscope: युवा शक्ती आणि उत्साहाचा संचार; 'या' राशींना मिळणार नोकरीत बढती, वाचा राशी भविष्य!

SCROLL FOR NEXT