RGP ZP List Dainik Gomantak
गोवा

Goa ZP Election: 'युती काबार'? काँग्रेसच्या 'फसवणुकी'ला आरजीपीचे प्रत्युत्तर; जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 12 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

RGP first candidate list: गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस आणि रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चांवर अखेर पडदा पडला

Akshata Chhatre

गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी मुख्य विरोधी पक्ष काँग्रेस (INC) आणि रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी (RGP) यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चांवर अखेर पडदा पडला आहे. काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केल्यानंतर, त्याला 'फसवणूक' झाल्याचं सांगत आरजीपीनेही लगेचच आपल्या १२ उमेदवारांची पहिली यादी घोषित केली आहे. या निर्णयामुळे दोन्ही विरोधी पक्षांमधील युती आता संपुष्टात आल्याचे मानले जात आहे.

यापुढे गोव्यात भाजप, काँग्रेस आणि आरजीपी यांच्यात तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत, ज्यामुळे मतांचे विभाजन अटळ आहे. आरजीपीचे अध्यक्ष तुकाराम परब यांनी गोमंतकीय जनतेला 'आरजीपी'च्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

आरजीपीने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या नावांमध्ये शिरोडा, सांताक्रुझ आणि हणजूण या तीन मतदारसंघांवर विशेष लक्ष वेधले जात आहे. शिरोडा मतदारसंघातून दीपिंती शिरोडकर, सांताक्रुझ (महिला-OBC) येथून एस्पेरन्सा ब्रागांझा आणि हणजूण (OBC) मतदारसंघातून मिंगेल क्वेरोज यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसच्या प्रभावक्षेत्रात थेट उमेदवार उतरवणे, हे विरोधी पक्षांच्या युतीच्या ताबूतमध्ये अंतिम खिळा ठरू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे

या पहिल्या यादीमध्ये आरजीपीने उत्तर गोव्यात सात आणि दक्षिण गोव्यात पाच उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. उत्तर गोव्यात धारगळ (OBC) मधून नारायण शिरोडकर, शिवोली (जनरल) मधून जयेंद्रथ पाडोळकर, तर कोळवाळ (महिला) मधून प्रज्ञा सावंत यांचा समावेश आहे.

दक्षिण गोव्यात वेलींग-प्रियोळ (महिला) मधून नीता जलमी, केवला (OBC) मधून विश्वेश नाईक, आणि बोरी (महिला) मधून हर्षा बोरकर यांना संधी मिळाली आहे. आरजीपीने आपली संपूर्ण ताकद पणाला लावत निवडणूक लढवण्याचा निर्धार या यादीतून स्पष्ट केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अँड्रॉइड स्मार्टफोन युझर्ससाठी धोक्याची घंटा! डॉल्बी ऑडिओमधील तांत्रिक बिघाडानं उडाली खळबळ; केंद्र सरकारकडून नवीन चेतावणी जारी

Accidental Deaths In Goa: 2025 मध्ये 335 लोकांनी गमावला जीव, गोव्यात एकूण 525 अपघात; निष्‍काळजीपणामुळे जास्त बळी

Marathi Drama Competition: मराठी राज्य नाट्य स्पर्धेत ‘द लास्ट सेल’चा डंका! वाचा स्पर्धेचा सविस्तर निकाल..

Bangladesh Violence: पेट्रोलचे 5 हजार मागितले अन् हिंदू तरुणाला कारखाली चिरडले, BNP नेत्यानं घेतला जीव; बांगलादेशात पुन्हा रक्ताची होळी

म्हादई अभयारण्यात कोत्राच्या नदीपात्रातून, पाच-सहा किमी डोंगर दऱ्या पार करून 'सिद्धेश्‍वराच्या गुंफे'कडे पोहोचता येते..

SCROLL FOR NEXT