Goa ZP election Dainik Gomantak
गोवा

Goa ZP Election: 'कमळा शिवाय पर्याय ना!', दोन्ही जिल्हा पंचायतींवर भाजपचा झेंडा, निवडणूक प्रचारासाठी CM सावंत स्वतः मैदानात

CM Pramod Sawant campaign: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजप उमेदवारांच्या प्रचारात स्वतः लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे

Akshata Chhatre

गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीच्या प्रचाराला आता जोर चढला असून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजप उमेदवारांच्या प्रचारात स्वतः लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी स्वतः साखळी येथे पाली जिल्हा पंचायत मतदारसंघातील भाजप उमेदवार सुंदर नाईक यांच्या प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली. प्रचाराचा शुभारंभ नावेलीतील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात नारळ ठेवून करण्यात आला, यावेळी भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जि. पं. निवडणुकीला विधानसभा निवडणुकीइतके महत्त्व द्या!

मुख्यमंत्र्यांनी यावेळी जिल्हा पंचायत निवडणुकीचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, या निवडणुकीला देखील इतर मोठ्या निवडणुकांप्रमाणेच महत्त्व देत सर्वांनी मतदान करणे गरजेचे आहे. डॉ. सावंत यांनी साखळीतील मतदारांना विनंती केली की, "विधानसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे मोठ्या संख्येने मतदान करत साखळी आपले नाव मिळवते, त्याप्रमाणे आता देखील जिल्हा पंचायत निवडणुकीत सर्वांनी उत्साहाने सहभागी व्हावे."

'कमळाशिवाय दुसरा पर्याय ना!'

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना २० डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकांमध्ये भाजपला गोव्यात निर्विवाद बहुमत मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, "एक गोष्ट लक्षात ठेवा, २० तारखेला आपण निश्चितच भाजपला मतदान करणार आहोत आणि यावेळी आपण संपूर्ण गोव्यात निर्विवाद बहुमत मिळवणार आहोत."

मात्र, पाली मतदारसंघात केवळ विजय मिळवून चालणार नाही, तर विक्रमी मताधिक्य मिळवण्याची गरज आहे, यावर त्यांनी भर दिला. 'आपल्याला इतके मोठे मताधिक्य मिळवायचे आहे की, आपल्या विरोधात लढणाऱ्यांना हे कळून यायला हवे की, कमळाशिवाय दुसरो पर्याय ना! (कमळाशिवाय दुसरा पर्याय नाही),' असे भावनिक आवाहन त्यांनी केले

ट्रिपल इंजिन सरकार आणि ८०% मतांचा दावा

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी पुन्हा एकदा 'ट्रिपल इंजिन सरकार' चा नारा दिला. दोन्ही जिल्हा पंचायतींवर भाजपचाच झेंडा फडकणार, ज्यामुळे गोव्याचा विकास वेगाने होईल, असा दावा त्यांनी केला. पाली मतदारसंघाबाबत त्यांनी मोठा दावा केला.

ते म्हणाले की, या मतदारसंघात ८० टक्क्यांहून अधिक मतदार भाजपला मिळणार असून, भाजप मोठ्या आघाडीने जिंकणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीचे महत्त्व अधोरेखित करताना कार्यकर्त्यांना आवाहन केले की, ही निवडणूक विरोधकांना भाजपची ताकद दाखवून देण्यासाठी महत्त्वाची आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने पक्षाचे कार्य निष्ठेने करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: 'पूजा नाईकच लोकांना फसवत होती', गुन्हे शाखेचा मोठा खुलासा! 17.68 कोटी रुपयांच्या 'कॅश फॉर जॉब'चे आरोप खोटे

Horoscope: 5 डिसेंबरपासून सुरू होईल 'सुवर्णकाळ'! मंगळ-बुध-गुरूची त्रिवेणी 'या' 4 राशींचे नशीब उजळणार

England Cricketer Death: क्रिकेट विश्वात शोककळा! इंग्लंडच्या 'या' दिग्गज माजी खेळाडूचे निधन

Goa Live News: कॅश फॉर जॉब प्रकरण, पूजाचा एमजीपी ऑफिसमध्ये काम करण्याचा दावा खोटा, एसपींनी दिली माहिती

Goa Crime: विजेचा धक्का की घातपात? कारापूर येथे अविवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू, परिसरात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT