Goa ZP Election Dainik Gomantak
गोवा

Goa ZP Election: ‘मये’त जिल्हा पंचायत निवडणुकीचे वारे जोरात! फॉरवर्ड, काँग्रेसचे उमेदवार निश्चित; दक्षिण गोव्यात भाजपची चाचपणी

Goa Zilla Panchayat Election: पक्ष प्रवेश करताच या पक्षाचे नेते तथा आमदार विजय सरदेसाई यांनी जिल्हा पंचायतीसाठी उमेदवार म्हणून प्रा.राधिका कळंगुटकर यांच्या नावाला पसंती दिल्याचे समजते.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डिचोली तालुक्यातील ‘मये’ जिल्हा पंचायत मतदारसंघात निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. महिलांसाठी राखीव असलेल्या या मये जिल्हा पंचायत मतदारसंघात गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेसतर्फे उमेदवार जवळपास निश्चित झाले असून, भाजप उमेदवारीबाबत मात्र अजूनही गुंता निर्माण झाला आहे.

मये जिल्हा पंचायत मतदारसंघातून प्रा. राधिका राजेश कळंगुटकर यांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आले आहे. ''आप''ला सोडचिठ्ठी देऊन अलीकडेच ''गोवा फॉरवर्ड''मध्ये प्रवेश केलेल्या प्रा. राजेश कळंगुटकर यांच्या प्रा.राधिका या पत्नी आहेत. आपल्या पतीसमवेत प्रा.राधिका यांनीही गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश केला आहे.

पक्ष प्रवेश करताच या पक्षाचे नेते तथा आमदार विजय सरदेसाई यांनी जिल्हा पंचायतीसाठी उमेदवार म्हणून प्रा.राधिका कळंगुटकर यांच्या नावाला पसंती दिल्याचे समजते. प्रा. राधिका कळंगुटकर यांनी निवडणूक लढविण्याच्यादृष्टीने मतदारसंघात सध्या मोर्चेबांधणीही सुरु केली आहे.दुसऱ्याबाजूने काँग्रेसतर्फेही मये मतदारसंघातून जिल्हा पंचायत निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. या मतदारसंघातून महिला गट काँग्रेसची अध्यक्ष नंदिता कवठणकर यांचे नाव जवळपास निश्चित केले आहे. अशी माहिती मिळालीआहे.

राखीव मतदारसंघ!

भाजपच्या उमेदवारीसाठी अनेक महिला इच्छुक असून, इच्छुकांची अंतिम नावे पक्षश्रेष्ठीकडे पाठविण्यात आल्याचे समजते. पक्षश्रेष्ठी यापैकी कोणाच्या नावाला पसंती देतात, त्याकडे भाजप कार्यकर्त्यांसह मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे. मये मतदारसंघ यावेळी राखीव करण्यात आल्यामुळे उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्षपद उपभोगलेले विद्यमान ''झेडपी'' शंकर चोडणकर यांची यावेळी या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची संधी हुकली आहे.

दक्षिण गोव्यात भाजपची उमेदवारांसाठी चाचपणी सुरू

आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी दक्षिण गोव्यातील पंचवीसही मतदारसंघासाठी उमेदवारांची चाचपणी भारतीय जनता पक्षाने सुरु केली आहे. आज दिवसभर भाजपच्या जिल्हा कचेरीत आज प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्य व दक्षिण गोवा समित्यांचे पदाधिकारी तसेच या भागातील मंत्री, आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज कचेरीत सकाळपासून प्रत्येक मतदारसंघातील संभाव्य उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या नावांची शिफारस करण्यासाठी त्यांच्या बरोबर त्या त्या मतदारसंघाचे आमदार सुद्धा होते. आज इच्छुक उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. पुढील काही दिवसात उमेदवार निश्र्चित केले जातील असे भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की बिहार प्रमाणे गोव्यातही भारतीय जनता पक्षाला लोकांचा पूर्ण पाठिंबा आहे. जिल्हा पंचायत निवडणूकीत लोक आमच्या पक्षा सोबत राहणार आहेत.

गेल्या निवडणुकीत उत्तर गोव्यात भाजप २५ पैकी २२ तर दक्षिण गोव्यात मगो सह १७ मतदारसंघ जिंकले होते. या वेळी भाजपच्या जिल्हा पंचायत सदस्यांची संख्या आणखी वाढणार आहे अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतचा 'पॉवर शो'! 102 मीटरचा षटकार ठोकत बनला नवा 'सिक्सर किंग', सेहवागचा रेकॉर्ड ब्रेक Watch Video

Goa Vs Rajasthan Tourism: पधारो म्हारो देस! संस्कृती दाखवणारे राजस्थानचे पर्यटन; गोव्याने ही कला शिकण्यासारखी..

Arambol: '..गावकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही'! आरोलकरांचे प्रतिपादन; हरमलच्या जमीन रूपांतरणास कडाडून विरोध

Fake Liquor Racket: उसगाव बनावट दारू प्रकरण! दीड कोटींचा मुद्देमाल जप्त; अजून 3 जणांना अटक

अमेरिकेतून 'देसी गर्ल' 7 वर्षानंतर गोव्यात, मालक स्वतः हातात प्लेट घेऊन आला स्वागताला; Video Viral

SCROLL FOR NEXT