Goa ZP Election Dainik Gomantak
गोवा

Goa ZP Election: कवळे जिल्हा पंचायतवर मगोपचे वर्चस्व, काँग्रेसची भूमिका अस्पष्ट; एकतर्फी लढत होण्याची दाट शक्यता

Goa Zilla Panchayat Election: विशेष म्हणजे, त्यावेळी मगोपचे पूर्वाश्रमीचे कार्यकर्ते सुदेश भिंगी यांनीही उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंड करून गणपत नाईकांविरुद्ध उमेदवारी दाखल केली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: कवळे जिल्हा पंचायत मतदारसंघ हा मडकई विधानसभा मतदारसंघातील एक महत्त्वाचा भाग आहे. या मतदारसंघात कवळे, बांदोडे, वाडी - तळावली, दुर्भाट -आडपई- आगापूर या चार महत्त्वाच्या पंचायती येतात. मगोपचे गणपत नाईक हे या मतदारसंघाचे विद्यमान जि.पं. सदस्य. यावेळी हा मतदारसंघ इतर मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवला आहे.

मडकई मतदारसंघ हा मगोपचा, पर्यायाने वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचा बालेकिल्ला समजला जातो. म्हणूनच या मतदारसंघातील सहाही पंचायती सध्या मगोपच्या ताब्यात असून कवळे जि.पं.ही मगोपकडेच आहे. मागीलवेळी हा जि.पं. मतदारसंघ सर्वसाधारण गटाकरिता असूनही मगोपच्या गणपत नाईक यांनी बाजी मारली होती.

विशेष म्हणजे, त्यावेळी मगोपचे पूर्वाश्रमीचे कार्यकर्ते सुदेश भिंगी यांनीही उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंड करून गणपत नाईकांविरुद्ध उमेदवारी दाखल केली होती. असे असूनही गणपत नाईक यांनी चांगली आघाडी घेऊन विजय प्राप्त केला होता. यावेळी स्थिती वेगळी आहे. मतदारसंघ आरक्षित झाल्यामुळे गणपत नाईक यांना पुन्हा मगोपची उमेदवारी मिळू शकते.

भाजपबरोबर युती होण्याची शक्यताही दिसते. असे झाल्यास एकतर्फी लढत होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. दुसऱ्या बाजूला काँग्रेस आघाडीवर येथे सामसूम दिसत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मडकई मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार कै. लवू मामलेदार यांना फक्त १,०९० मते प्राप्त झाली. त्यामानाने ‘आरजी’ने ३,४८८ मते घेऊन चमक दाखविली होती.

विरोधकांची एकी, तरीही मगोप सरस

यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस, आरजी आणि गोवा फॉरवर्ड एकत्र झाल्यास थोडीफार चुरस निर्माण होऊ शकते. तरीसुद्धा मगोपला गाठणे त्यांना कठीण होईल, असे सद्यस्थितीवरून दिसते. आता विरोधकांची आघाडी झाल्यास हा मतदारसंघ कोणत्या पक्षाला देणार, यावरही या निवडणुकीतील समीकरणे अवलंबून आहेत. पण सध्या मगोप-भाजप युती झाली वा नाही झाली तरी येत्या निवडणुकीत मगोपच मुसंडी मारू शकतो, अशी स्थिती दिसून येते.

...तर भाजपची दुय्यम भूमिका

मगोपने कवळे मतदारसंघात जय्यत तयारी सुरू केल्याचे दिसते. त्यामानाने भाजप विशेष सक्रिय झालेला दिसत नाही. तशी भाजपचीही या मतदारसंघात म्हणावी एवढी भक्कम स्थिती नाही. मागील विधानसभा निवडणुकीत मडकई मतदारसंघात भाजपला फक्त ४ हजार मते प्राप्त झाली होती, तर मगोपने दहा हजार मतांची आघाडी घेऊन विजय प्राप्त केला होता. त्यामुळे या निवडणुकीत भाजप दुय्यम भूमिका स्वीकारण्याची शक्यता अधिक असल्याची चिन्हे दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात होणार 'WAVES फिल्म बाजार' चे उद्घाटन! 22 फीचर फिल्म; मराठी, कोकणी संस्कृतसह 18 हून अधिक भाषांतील कथा होणार सादर

'भारतामुळेच माझ्या आईचा जीव वाचला!' शेख हसीनांच्या मुलानं पंतप्रधान मोदींचे मानले आभार; बांगलादेश सरकारवर केले गंभीर आरोप

IFFI Country Focus: इफ्फी 'कंट्री फोकस'साठी जपानची निवड, कोणत्या खास फिल्म्स असणार; पहा..

International Mens Day: मुलाने विचारले 'आंतरराष्ट्रीय पुरुष दिन हा स्त्री दिनाप्रमाणे लोकप्रिय का नाही?’ तेंव्हा वडील म्हणाले.....

Baina: चोरांनी केली मारहाण, तरीही खिडकीतून पळाली! बायणा दरोड्यात 15 वर्षीय मुलीने वाचवले कुटुंबाचे प्राण; पुरस्कारासाठी शिफारस

SCROLL FOR NEXT