Kavale: वन्यप्राणी, मोकाट गुरांना रोखा! बिबटे, गव्यांमुळे भीतीचे वातावरण; कवळे ग्रामसभेत चर्चा

Kavale Panchayat Goa: कवळेच्या ग्रामसभेत वन्यप्राण्यांचा पंचायत क्षेत्रात चाललेला धुडगूस तसेच रस्त्यावरील मोकाट गुरांमुळे होणाऱ्या अपघातांवर जोरदार चर्चा झाली. तसेच कचरा व इतर विषयांवरही चर्चा झाली.
Indian Gaurs
BisonDainik Gomantak
Published on
Updated on

कवळे: कवळेच्या ग्रामसभेत वन्यप्राण्यांचा पंचायत क्षेत्रात चाललेला धुडगूस तसेच रस्त्यावरील मोकाट गुरांमुळे होणाऱ्या अपघातांवर जोरदार चर्चा झाली. तसेच कचरा व इतर विषयांवरही चर्चा झाली. रविवारी झालेल्या या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच मनुजा नाईक तसेच उपसरपंच सुशांत कपिलेश्‍वरकर, इतर पंच, सचिव व गटविकास कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पंचायत क्षेत्रात वन्य प्राण्यांनी धुडगूस घातला आहे. राने नष्ट होत चालल्याने ही रानटी जनावरे लोकवस्तीत येत आहेत. बिबटे, गवे, रानडुक्कर, माकड व इतर प्राण्यांनी उच्छाद मांडला असून बिबटे, गव्यांमुळे लोकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. माकडे व इतर प्राण्यांकडून बागायती नष्ट केल्या जात असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे वन खात्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. पंचायतीने वन खात्याला यासंबंधी एक निवेदन देऊन आवश्‍यक कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

सरपंच मनुजा नाईक यांनी घरपट्टीसाठी सर्वेक्षण सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. ग्रामस्थांनी यावेळी काही लोकांनी नाल्याचे रूपांतर गटारात केल्यामुळे सगळीकडे ओंगळवाणी स्थिती असून पंचायतीने अशा नाल्यांचेही सर्वेक्षण करून आवश्‍यक कारवाई करण्याची मागणी केली. इतर काही प्रश्‍नांवरही चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात आले. ग्रामसभेच्या सुरवातीला पंचायत सचिवाने मागील ग्रामसभेचा अहवाल सादर केला.

Indian Gaurs
Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी

मोकाट गुरांमुळे वाढते अपघात!

कवळे पंचायत क्षेत्रात विशेषतः ढवळी रस्त्यावर मोकाट गुरे ठाण मांडून बसत असल्याने या ठिकाणी जीवघेणे अपघात होत असल्याचे ग्रामस्थांनी पंचायतीच्या निदर्शनास आणून दिले. या मोकाट गुरांचा त्वरित बंदोबस्त करा, अशी मागणी करताना दुभाजकांवरील वाढलेली झाडे कापून टाकावी. तसेच पथदीप लागतात की नाही, याची खबरदारी संबंधितांनी घ्यावी, अशी सूचना ग्रामस्थांनी केली.

Indian Gaurs
Leopard Accident: .. रात्री स्कुटरला धडकला बिबट्या, गाडी कलंडल्याने विद्यार्थी जखमी; आगरवाडा येथील घटना

कचरा समस्येवर चर्चा

यावेळी कचऱ्याच्या विषयावरही चर्चा झाली. मलेरिया, डेंगूसारख्या घातक रोगांना दूर करण्यासाठी पंचायतक्षेत्रात ‘फॉगिंग'' करण्याची मागणी केली. जुनी गटारे काही ठिकाणी कोसळली असल्याने ती नव्याने बांधण्याची मागणी केली. गावातील सुका कचरा नियुक्त केलेल्या कामगारांकडे सुपूर्द करा, असे आवाहन पंचायत मंडळातर्फे करण्यात आले. लोकांच्या समस्या पंचायतीकडे पोचवण्यासाठी ‘व्हॉटस्ॲप गृप'' तयार करावा, अशी सूचनाही ग्रामस्थांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com