Elvis Gomes  Dainik Gomantak
गोवा

Goa News: काँग्रेसचे नेतृत्व कमी पडले- एल्विस गोम्स

दैनिक गोमन्तक

Goa News: काँग्रेस पक्षातून दुसऱ्यांदा आमदार फुटल्यावर मतदार या पक्षाला विटले होते. या मतदारांना जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी वेगळा कार्यक्रम हाती घेण्याची गरज होती. स्थानिक काँग्रेस नेतृत्व नेमके येथेच कमी पडले. त्यामुळे तिन्ही ठिकाणी पक्षाला मानहानिकारक पराभव पत्‍करावा लागला, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्‍या व्यावसायिक विभागाचे गोवा अध्यक्ष एल्विस गोम्स यांनी व्यक्त केली.

पाहिल्या फुटीनंतरही मतदारांनी काँग्रेस पक्षावर परत विश्वास दाखविला. मात्र दुसऱ्यांदा काँग्रेस पक्ष फुटल्यावर लोकांची निराशा झाली. वास्तविक विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने अशा काही उमेदवारांना उमेदवारी दिली जे, पुढे फुटू शकतात हे सर्वांनाच ज्ञात होते.

तरीही त्यांना उमेदवारी देण्यात आली. यावेळी काँग्रेसला संघटित शक्ती दाखवून भाजपला टक्कर देता आली असती, पण स्थानिक नेतृत्वाने त्यासाठी काहीच केले नाही, असे गोम्‍स म्‍हणाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा सुरू झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांत चैतन्य आले आहे. पण गोव्यात काही बदल दिसत नाही. आता केंद्रात नवीन पक्षाध्यक्ष आल्यावर तरी येथील गोष्टी जाग्‍यावर पडतील अशी अपेक्षा गोम्स यांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

SCROLL FOR NEXT