Goa Zilla Panchayat Election 2022 Dainik Gomantak
गोवा

Goa Zilla Panchayat Election 2022: मतदान कमी तरीही भाजपात उत्‍साह!

Goa Zilla Panchayat Election 2022: दिवसभर या मतदारसंघात मतदारांची तुरळक संख्याच केंद्रांवर दिसून आली.

दैनिक गोमन्तक

Goa Zilla Panchayat Election 2022: पुन्‍हा पुन्‍हा येणाऱ्या निवडणुका आणि सायंकाळी अवतरलेले पावसाळी वातावरण यामुळे जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीत दवर्लीच्या मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. परिणामी फक्त 50.52 टक्केच मतदान झाले. मात्र ही कमी टक्केवारी आपल्याला फायदेशीर ठरेल, असा दावा भाजप कार्यकर्त्यांनी केला असून त्यांच्यात पुरेपूर उत्साह दिसून आला.

मुस्‍लिम मतांची संख्या जिथे जास्त आहे, त्या रुमडामळ पंचायतीत आमदार तुयेकर ठाम मांडून बसले होते. दुसरीकडे भाजपला काँग्रेस (Congress) पक्ष टक्कर देईल असा विश्वास लियोन रायकर यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. भाजपचे परेश नाईक, काँग्रेसचे लियोन रायकर व आम आदमी पक्षाचे सिद्धेश भगत हे या निवडणुकीतील मुख्य स्पर्धक असून आणखी चार अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.

दवर्लीत संध्‍याकाळी 4 वाजेपर्यंत 41.80 टक्के झाले होते. दिवसभर या मतदारसंघात मतदारांची तुरळक संख्याच केंद्रांवर दिसून येत होती. आपले मतदान वाढावे यासाठी भाजप कार्यकर्ते लोकांना मतदान केंद्रावर आणताना दिसत होते. काँग्रेस आणि ‘आप’च्या पातळीवर मात्र सामसूम होती.

रुमडामळ-दवर्ली पंचायत कोणाबरोबर?

पंचायत निवडणुकीत भाजपपुरस्कृत समितीच्या उमेदवारांना पाडून सात मुस्‍लिम उमेदवारांना निवडून आणणारी रुमडामळ-दवर्ली पंचायत यावेळी कुणाबरोबर होती याचा अंदाज शेवटपर्यंत आलाच नाही. ही मते सरसकट काँग्रेसच्या बाजूने गेली तर भाजपसाठी ती धोक्याची घंटा ठरू शकते, असा अंदाज राजकियतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

तसेच, यावेळी माजी सरपंच (Sarpanch) मुर्तुझा कुकनूर निवडणूक रिंगणात होते. मात्र त्यांना भाजपनेच उभे केले असा प्रचार झाल्याने त्यांच्‍या पारड्यात फारशी मते पडण्याची शक्यता नाही. मात्र ही मते काँगेसचे लियोन रायकर आणि ‘आप’चे सिद्धेश भगत यांच्यात विभागल्‍यास त्‍याचा फायदा भाजपला होऊ शकतो. परंतु तेथे पीएफआयचा विषय गाजला. भाजपला फटका बसू शकतो.

पहिल्‍या तीन तासांत 10 टक्‍क्‍यांपेक्षाही कमी

मतदारांमध्‍ये सकाळी 11 वाजेपर्यंत निरुत्साह दिसून आला. म्‍हणूनच पहिल्‍या तीन तासांत 10 टक्‍क्‍यांपेक्षाही कमी मतदानाची नोंद झाली होती. प्रत्येक मतदान केंद्रावर धीम्यागतीने मतदान सुरू होते. केंद्राबाहेर उमेदवारांची, कार्यकर्त्यांची लगबग दिसत नव्‍हती. केवळ नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, उमेदवार परेश नाईक व त्यांचे कार्यकर्ते हालचाल करताना दिसत होते.

दरम्‍यान, दवर्ली-रुमडामळ पंचायतीबाहेर आमदार (MLA) तुयेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मतदानाला जोर नसल्याचे मान्य केले. एकूण मतदान 50 टक्‍क्‍यांच्‍या आसपास होईल असे सांगून भाजप उमेदवाराचा विजय निश्‍चित असल्‍याचा दावा त्‍यांनी केला. उमेदवार परेश नाईक यांच्‍या चेहऱ्यावरही समाधान पसरले होते.

उल्हास तुयेकर, आमदार-

दवर्लीत भाजपचा उमेदवार किमान दीड ते दोन हजारांच्या मताधिक्‍क्याने विजयी होईल. या अनुषंगाने आम्‍ही येथे विजयाची हॅट्‌ट्रिक साधणार आहोत. मागील सलग दोन वेळा आपण निवडून आलो होतो. कमी झालेले मतदान आमच्‍यासाठी फायदेशीर.

मुमताज तुर्की, रुमडामळ-दवर्लीच्‍या माजी सरपंच-

यावेळी रुमडामळ येथे अपेक्षेप्रमाणे मतदान झालेले नाही. खूपच कमी मतदान झाले. ‘पैसा फेको, तमाशा देखो’ ही येथील आता पद्धत बनली आहे. यावेळी येथे कोणीच पैसा बाहेर काढला नाही. त्यामुळे मतदारही घराबाहेर आले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

SCROLL FOR NEXT